AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीची TMC विरोधात मोठी कारवाई, पाच ठिकाणी छापेमारी; बँक खात्यांमधील 440 कोटी रुपये गोठवले

Enforcement Directorate Raid : ईडीने सुमारे 440 कोटी रुपये असणाऱ्या टीएमसीच्या एचडीएफसी बँक खात्यांची चौकशी सुरू केली असून ही खाती गोठवली आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ईडीची TMC विरोधात मोठी कारवाई, पाच ठिकाणी छापेमारी; बँक खात्यांमधील 440 कोटी रुपये गोठवले
Mamata Banerjee EDImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 08, 2026 | 10:28 PM
Share

अंमलबजावणी संचालनाल म्हणजेच ED ने पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने सुमारे 440 कोटी रुपये असणाऱ्या टीएमसीच्या एचडीएफसी बँक खात्यांची चौकशी सुरू केली असून ही खाती गोठवली आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर समोर आलेल्या वादग्रस्त बँक खात्यांद्वारे कथित बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, निधी गोळा करणे आणि पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला होता, याच प्रकरणाची चौकशी करताना ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीच्या तपासात काय समोर आले?

ईडीच्या तपासाच्या कक्षेत केअरवेल समूहाच्या विमानवाहतूक क्षेत्रातील कंपन्या आहेत. ईडीच्या माहितीनुसार, एप्रिल 2023 ते जून 2026 या कालावधीत AITC च्या खात्यांतून सुमारे 160 कोटी रुपये केअरवेल एव्हिएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्याशी संबंधित दुसऱ्या एका कंपनीला पाठवण्यात आले. त्यानंतर केअरवेल एव्हिएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने 2023 ते 2026 दरम्यान सुमारे 82.96 कोटी रुपये स्वतःच्या नव्याने स्थापन केलेल्या कंपनीकडे वर्ग केले आहे.

ईडीला छापेमारीदरम्यान आढळले की या निधीचा मोठा भाग एका कंपनीमार्फत एम्ब्रेअर लेगेसी 600 विमान आणि अगस्ता 109 एसपी हेलिकॉप्टर खरेदीसाठी वापरण्यात आला. ईडीच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही खरेदींसाठी सुमारे 112 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हेलिकॉप्टर खरेदीसाठी काही परदेशी निधीचाही वापर करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे, मात्र बहुतांश रक्कम थेट AITC च्या खात्यांतून आल्याचे समोर आले आहे.

ईडीने काय म्हटलं?

ईडीच्या म्हणण्यानुसार, विमान आणि हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर ते भाडेतत्त्वावर पुन्हा AITCलाच देण्यात आले. त्याबदल्यात विमानांच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात करण्यात आले. प्रथमदर्शनी हा संपूर्ण आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटत असून, या पैशांचा प्रत्यक्ष वापर कोणत्या उद्देशासाठी करण्यात आला याबाबत तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बंगालमध्ये राजकीय वाद

ईडीच्या या कारवाईनंतर पश्चिम बंगालचे राजकारण तापले आहे. टीएमसीने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप केला असून, भाजपने मात्र भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई म्हणत कारवाईचे समर्थन केले आहे. या कंपनीने यापूर्वी टीएमसीच्या वरिष्ठ नेते ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचाही समावेश असल्याचे म्हटले होते. तपास यंत्रणा आता या आर्थिक व्यवहारांचा आणि निधीच्या स्रोतांचा सखोल तपास करत आहे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार