AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ एकनाथ शिंदेच… बड्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान; गल्ली ते दिल्लीपासून चर्चांना उधाण

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार म्हटले आहे. सत्ता परिवर्तनाच्या चर्चांदरम्यान रिजिजू यांनी बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ शेअर करत, शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही हे त्यांचे मत अधोरेखित केले. शिंदेंमुळेच शिवसेना बाळासाहेबांच्या मार्गावर असल्याचे त्यांचे मत आहे, ज्यामुळे दिल्लीपर्यंत चर्चा सुरू आहे.

केवळ एकनाथ शिंदेच... बड्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान; गल्ली ते दिल्लीपासून चर्चांना उधाण
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 9:46 PM
Share

विरोधकांकडून देशात सत्ता परिवर्तन करण्याची मागणी केली जात आहे. त्यावरून सत्ताधारी भाजपने विरोधकांना चांगलंच घेरलं आहे. जे बांगलादेशात झालं, तेच विरोधकांना करायचं आहे, असा हल्ला सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. किरेन रिजिजू यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं आहे. मला बाळासाहेबांची खूप आठवण येतेय, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही खास उल्लेख केला आहे.

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी एक ट्विट केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एक क्लिप पोस्ट केली आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही एक क्लिप पोस्ट केली आहे. त्यानंतर त्यावर त्यांनी एक कमेंट केली आहे. रिजिम चेंजच्या अनुषंगाने रिजिजू यांनी ही पोस्ट केली आहे.

राऊत काय म्हणाले?

रिजिजू यांनी संजय राऊत यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात राऊत मीडियाशी संवाद साधताना दिसत आहेत. रिजिम चेंज होईल. तुम्ही पाहत राहा. राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत ना. ते आल्यावर पाहाच तुम्ही, असं राऊत म्हणताना दिसत आहे.

बाळासाहेब काय म्हणाले?

यावेळी रिजिजू यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात बाळासाहेब म्हणतात, मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. कधीच नाही. शिवसेनेची काँग्रेस होतेय असं वाटलं तर मी शिवसेना बंद करून टाकीन. त्यानंतर शिवसेना निवडणूक लढणार नाही. कुठे जातील हे लोक?

आज जो तुम्हाला मान सन्मान मिळत आहे, तो केवळ शिवसेनेच्या नावाने मिळत आहे. भगवा झेंडा मिळत आहे. त्याच्याशी गद्दारी करणार की मारामारी करणार? असा सवालही बाळासाहेब विचारताना दिसत आहेत.

शिंदेंबद्दल काय म्हणाले?

रिजिजू यांनी या पोस्टमध्ये शिंदेंचं कौतुक केलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे एकमेव असे नेते आहेत की, जे पक्षाला बाळासाहेबांच्या विधारधारेनुसार पुढे नेत आहेत, असं म्हणत रिजिजू यांनी शिंदेंचं कौतुक केलं आहे. देशात सर्व विरोधक रिजिम चेंजची भाषा करत आहेत. त्यासाठी देशभरात मोर्चे आयोजित केले जात आहेत, अशावेळी रिजिजू यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे रिजिजू यांच्या पोस्टची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!