हायला… युद्ध सोडा, पोरं पैदा करा; 12 मुलांचा बाप एलन मस्कची पोस्ट व्हायरल, लोकांना नको ते वाटलं

एलन मस्कची "मुलं जन्माला घाला, युद्ध नको" ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टचे अनेक अर्थ लावले जात आहेत. काहींना वाटते की, मस्क यांची ही अमेरिकेतील युद्धविरोधी भूमिका आहे, तर काहींचा असा विश्वास आहे की, ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट आहे.

हायला... युद्ध सोडा, पोरं पैदा करा; 12 मुलांचा बाप एलन मस्कची पोस्ट व्हायरल, लोकांना नको ते वाटलं
Elon musk
Image Credit source: Tv9 Telugu
| Updated on: Mar 11, 2025 | 4:58 PM

सध्या अब्जाधीश आणि टेस्लाचा मालक एलन मस्क भलताच चर्चेत आहे. त्याची एक पोस्ट रिपोस्ट झालीय. त्याने X वर एक फोटो रिपोस्ट केला आहे. त्यात त्याचं पेंट करण्यात आलेलं कॅरिकेचर दिसत आहे. या पेटिंगमध्ये मस्क काळा सूट आणि चष्म्यात दिसत असून बोर्डाच्या एका साईडला इशारा करत आहे. त्यावर लिहिलंय… MAKE KIDS, NOT WAR.

ही पोस्ट सर्वात आधी @cb_doge ने शेयर केली होती. त्यानंतर पाहता पाहता या पोस्टला 66 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टच्या अनुषंगाने अनेक चर्चा रंगल्या आहेत. मस्कचा स्वत:च्या पर्सनल लाईफकडे तर हा इशारा नाही ना? अशी चर्चाही रंगली आहे. मस्क नेहमीच लोकसंख्या वाढावी या मताचे राहिले आहेत. त्यामुळेच त्यांची पोस्ट व्हायरल होताच लोकांनी आपआपले तर्कट लावत आहेत. मस्क यांच्या घरी नवीन पाहुणा येणार वाटतं? असं काही लोकांचं म्हणणं आहे.

मस्क यांना नेमकं म्हणायचं काय?

अमेरिकेत होणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब मस्क दाखवत आहेत, असं काही लोकांचं म्हणणं आहे. मस्क डोनाल्ड ट्रंपचे समर्थक आहेत आणि त्यांच्या सरकारचे एक भाग होते. ट्रंप यांच्या धोरणानुसार, अमेरिकने कोणत्याही युद्धात अडकणे टाळावे, असं मस्क यांना सूचवायचं असेल. अलीकडेच ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात सीझफायर करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही, रिपब्लिकन पार्टी त्यांच्या धोरणांचा विरोध करत आहे. अशा परिस्थितीत, मस्क त्यांच्या पोस्टद्वारे हे संदेश देऊ इच्छित आहेत की, आता युद्धाची समाप्ती होणे आवश्यक आहे आणि अमेरिकेने नेहमी युद्धांपासून दूर राहावे.

Elon Musk Post

चंगेज खानशी कनेक्शन

चंगेज खान मस्कचा आवडता आहे. चंगेज खानाच्या इतिहासाशी आणि वंशवृद्धीच्या बाबतीतही मस्कचं एक कनेक्शन आहे. इतिहासकारांच्या मते, चंगेज खानने हजारो मुलांना जन्म दिला होता आणि त्यांचे डीएनए आजही सुमारे 1.6 कोटी लोकांमध्ये आढळते. मस्कही त्यांच्या वंशवृद्धीबाबत तितकेच outspoken आहेत, जितके चंगेज खान त्याच्या काळात होते.

एलन मस्काल किती मुले?

मस्क चार वेगवेगळ्या महिलांशी लग्न करून 14 मुलांचा बाप झाला आहे. त्यांची पहिली पत्नी जस्टिन विल्सन हिच्यापासून त्यांना तीन मुलं आहेत. प्रसिद्ध गायिका ग्राइम्स हिच्यापासून त्यांना तीन मुलं आहेत. याशिवाय, न्यूरालिंकच्या कार्यकारी शिवोन जिंलिस यांच्यापासूनही त्यांनी दोन मुलं आहेत.

एलोन मस्क यांनी पूर्वीच अमेरिका आणि युरोपमध्ये जन्मदर कमी होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी अनेक वेळा कुटुंब वाढवण्यावर आणि अधिक मुलं जन्माला घालण्यावर भर दिला आहे. आताही त्यांच्या पोस्टने सोशल मीडियावर अशी चर्चा निर्माण केली आहे, त्याचे ठोस उत्तर कदाचित मस्ककडेही नसावे!