Explainer : जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झालं तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या प्रंचड संघर्ष निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे, अमेरिकेनं मध्य पूर्वेत आपल्या युद्धनौका तयार ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे इराणमध्ये देखील सैन्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Explainer :  जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झालं तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
Iran, America
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 7:20 PM

अमेरिका आणि इराण यांच्यामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या विमानवाहू नौका अमेरिकेनं मध्य पूर्वेत तैनात केल्या आहेत. त्यासोबतच शेकडो फायटर जेट आणि मिसाईल डिस्ट्रॉयर तसेच थाडसारखी डिफेन्स सिस्टम देखील तैनात करण्यात आली आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते अशी परिस्थिती आहे. मात्र आता या सर्व पार्श्वभूमीवर जर समजा अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झालंच तर कोणं जिंकणार? कोणाची ताकद अधिक आहे? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या दोन्ही देशांबद्दल.

अमेरिका इराणवर हल्ला करू शकते मात्र अमेरिकेच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा जर कोणता असेल तर तो म्हणजे इराणची भौगोलिक परिस्थिती, जेव्हा 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला होता, तेव्हा इराकचा भूभाग हा सपाट असल्यामुळे अमेरिकेला त्या ठिकाणी कोणतीही अडचण जाणवली नाही, मात्र इराणमध्ये ती परिस्थिती नाहीये. इराणला चारही बाजुने उंच पर्वतांचा वेढा आहे, त्यामुळे इराणला टेबल लँन्ड असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे इराणवर हल्ला करणं हे अमेरिकेसाठी वाटतं तितंक सोपं नाहीये. अमेरिकेकडून होणाऱ्या संभाव्य हल्लाचा धोका लक्षात घेता इराणने देखील आपलं सैन्यदल तयार ठेवलं आहे. एखाद्या डोंगराळ प्रदेशात जाऊन दुसऱ्या देशावर हल्ला करणं कोणत्याही देशातील सैन्यसाठी सोपं काम नसतं. इराणच्या सभोवती असणारे उंच पर्वत हे इराणचं सुरक्षा कवच आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेबाबत बोलायचं झाल्यास अमेरिकेकडे प्रचंड सैन्य क्षमता आहे. अमेरिकेकडे अत्याधुनिक आणि विनाशक शस्त्रास्त्र आहेत. अमेरिकेने यापूर्वीच आपल्या दोन जगातील सर्वात मोठ्या युद्धनौका मध्यपूर्वेच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. तसेच शेकडो फायटर जेट देखील पाठवले आहेत. अमेरिकेची ताकद ही इराणपेक्षा खूप जास्त आहे. मात्र दुसरीकडे आता इराणला रशिया आणि चिनचं देखील पाठबळ मिळताना दिसत आहे, अशा परिस्थितीमध्ये विजयाचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार हे आतातरी या क्षणाला सांगणं कठीण आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us