Love Affairs : त्याचा बायकोत खूप जीव, पण प्रेयसी रुसून बसली, पुढे घडलं असं काही की पोलीसही चकित!
त्नी घरातून गायब असल्याने मोनू अस्वस्थ होता. 23 ऑगस्टलाच त्याने पोलrस ठाण्यात धाव घेत राखी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी राखीचा शोध सुरू केला. घरच्यांकडे चौकशी झाली. परिसर पिंजून काढला गेला.

MP Love News : 23 ऑगस्टची सकाळ. नेहमीप्रमाणे मोनू रैकवार कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला. घरात त्याची पत्नी राखी होती. ती आपलं रोजचं काम करत होती. पण नंतर असं घडलं की संपूर्ण परिसर हादरून गेला. मोनू रैकवार याच्या जुन्या प्रेयसीने असं काही घडवून आणलं की अनेकांच्या डोळ्यावर विश्वासही बसला नाही.
नेमकं काय घडलं?
मोून रैकवार नावाचा व्यक्ती भोपाळमधील रातीबड परिसरातील गोरेगावात आपल्या पत्नीसोबत सुखाने राहायचा. त्याच्या पत्नीचे नाव राखी होते. परंतु मोनूला कदाचित कल्पनाही नव्हती की, तो घराबाहेर पडताच त्याच्या घरात काहीतरी भयंकर घडणार आहे. मोनूची जुनी गर्लफ्रेंड शशी त्याचा एक्स बॉयफ्रेंड नरेंद्रला घेऊन मोनूच्या घरात शीरली आणि त्या दोघांनी राखीचा निर्घृण पद्धतीने खून केला.
नरेंद्रने तिचा गळा आवळला
पोलिसांच्या तपासानुसार, शशीला राखीचं मोनूसोबत राहणं पसंत नव्हतं. याच कारणातून तिने नरेंद्रसोबत मिळून राखीला संपवण्याचा कथित कट रचला.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शशीने राखीचं तोंड दाबलं, तर नरेंद्रने तिचा गळा आवळला. यातच राखीचा मृत्यू झाला.
राखीचा मृतदेह लपवायचा कुठे?
मोनू घराबाहेर गेल्यानंतर राखीचा त्या दोघांनी खून केला. परंतु खून केल्यानंतर मृतदेह नेमका कुठे लपवावा असा प्रश्न त्या दोघांनाही सतावत होता. त्यांनी मृतदेह चादरीत गुंडाळला आणि घराजवळच असलेल्या पडीक धरात लपवून ठेवला. त्यानंतर नरेंद्र तिथून निघून गेला आणि थेट इटारसीला पोहोचला.
पत्नी घरातून गायब असल्याने मोनू अस्वस्थ होता. 23 ऑगस्टलाच त्याने पोलrस ठाण्यात धाव घेत राखी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी राखीचा शोध सुरू केला. घरच्यांकडे चौकशी झाली. परिसर पिंजून काढला गेला. सीसीटीव्ही तपासले तरी राखीचा काहीच पत्ता लागत नव्हता. शेवटी मात्र 27 ऑगस्टच्या सकाळी गोरेगाव परिसरातील एका पडक्या घरातून राखीचा महिलेचा मृतदेह सापडला.
राखीला कोणी मारलं आणि का?
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. तपासाची सुई मोनूी प्रेयसी शशीकडे वळली. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. पोलिसांच्या दाव्यानुसार, चौकशीत शशीने नरेंद्रसोबत मिळून राखीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं असून न्यायालयापुढे हजर केलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.