AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Celebrity Affairs: माधुरीचे क्लोज-अप शॉट्स पाहण्यासाठी यायचा अन्… 90 च्या दशकातील 3 चर्चीत अफेअर्सवर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

Celebrity Affairs: बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. आता प्रसिद्ध दिग्दर्शकाने 90 च्या दशकातील तीन चर्चीत अफेअवर मोठा खुलाला केला आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिग्दर्शकाच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Celebrity Affairs: माधुरीचे क्लोज-अप शॉट्स पाहण्यासाठी यायचा अन्... 90 च्या दशकातील 3 चर्चीत अफेअर्सवर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
Celebrity Affairs
| Updated on: Nov 26, 2026 | 4:00 PM
Share

Celebrity Affairs: झगमगत्या विश्वात अशा काही ‘लव्हस्टोरी’ होऊन गेल्या त्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. 90 दशकातील सेलिब्रिटी आज त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे. पण भूतकाळात घडलेल्या गोष्टी कधीच पुसता येत नाहीत. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं. यामध्ये अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांची देखील नावं आहे. एवढंच नाही तर, या यादीमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री करिष्मा कपूर देखील सामिल आहे. यांच्या खासगी आयुष्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात, पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक लॉरेंस डिसूझा यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अफेअरवर मोठं वक्तव्य केलं आहे.

मिथुन चक्रवर्ती आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी…

दिग्दर्शक लॉरेंस डिसूझा यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्या अफेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘गैर कानूनी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, मिथून दा आणि श्रीदेवी यांच्यामध्ये प्रेम बहरलं… पण तेव्हा अभिनेते विवाहित होते. दिग्दर्शक म्हणाले, ‘सेटवर प्रत्येक 15 मिनिटांनंतर मिथुन यांचा फोन यायचा आणि श्रीदेवी सतत फोन उचलण्यासाठी पळत जायच्या.. त्यानंतर शॉट द्यायती आणि 10 – 15 मिनिटांनी पु्न्हा फोनवर बोलण्यासाठी जायची.’ मिथुन दा देखील सेटवर आलेल, सर्वांसमोर त्यांचं अफेअर सुरु होतं.

शूटिंग संपल्यानंतरही करिश्माची वाट पाहायचा अजय देवगण

अजय देवगण आणि करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील सर्वात चर्चित ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक होती. दोघांनी ‘जिगर’, ‘संग्राम’ आणि ‘सुहाग’ यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. यानंतर त्यांच्या अफेअरच्या अफवाही उडाल्या होत्या. यावर लॉरेन्स डिसूझा यांनी ‘संग्राम’च्या सेटवरील एक किस्सा सांगताना म्हटले की, “‘संग्राम’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण सेटवर येऊन बसायचा. पॅक-अप झाल्यानंतरही तो करिश्मासाठी थांबून राहायचा.”

संजय दत्त-माधुरीच्या नात्यावर काय म्हणाले दिग्दर्शक?

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचं नातं देखील खूप चर्चेत राहिलं. आज देखील दोघांच्या नात्याची चर्चा सुरु असते. दोघांनी लॉरेन्स डिसूझा यांच्या ‘साजन’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमाच्या सेटवरील आठवण सांगताना ते म्हणाले, “संजय दत्त सेटवर माधुरीचे क्लोज-अप शॉट्स पाहण्यासाठी यायचा.”, सध्या सर्वत्र सेलिब्रिटींच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

Follow Us
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर