AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्वा, याला म्हणतात ‘दादा’! ऐतिहासिक द्विशतकानंतर वैभवबद्दल सौरव गांगुली मोलाचं बोलला

UAE विरुद्ध अवघ्या 52 बॉलमध्ये द्विशतक झळकावून वैभव सूर्यवंशीने क्रिकेटविश्वाला थक्क केलं. त्याच्या या ऐतिहासिक खेळीनंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीनं मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाला गांगुली?

व्वा, याला म्हणतात 'दादा'! ऐतिहासिक द्विशतकानंतर वैभवबद्दल सौरव गांगुली मोलाचं बोलला
Sourav Ganguly On Vaibhav Sooryavanshi 204 runsImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 4:05 PM
Share

वैभव सूर्यवंशीने युएईविरुद्ध 52 चेंडूंमध्ये सर्वात जलद डबल शतक झळकावून लिस्ट ए क्रिकेटमध्ये इतिहास रचला. या युवा फलंदाजाने आपल्या या आक्रमक खेळामध्ये 28 षटकार मारून मोठा लिस्ट ए विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या या प्रभावी कामगिरीनंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीने त्याचे कौतुक केले, पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. गांगुली म्हणाला की “वैभव एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या वयात, तो आयपीएलमध्येही खूप चांगला खेळला आहे. देशासाठी तो एक मोठी आशा आहे. भारतासाठी त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीत तो चांगला खेळला आहे. तो भारताचं भविष्य आहे.”

पण यावेळी सौरव गांगुलीने आता वैभवची महान खेळाडूंशी तुलना करण्याविरोधात इशारा दिला. ते म्हणाले, “तुलना करू नका किंवा काहीही करू नका, त्याला फक्त खेळू द्या. तो डावखुरा फलंदाज आहे, फक्त 15-16 वर्षांचा आहे, त्याला खेळू द्या.”, असं गांगुली म्हणाला आहे.

दोहामध्यये UAE विरुद्ध  250 धावांचे लक्ष्य गाठताना सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवला. तो प्रचंड लयीत खेळत होता. त्याने अवघ्या 16 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध 11  बॉलमध्ये केलेल्या विक्रमी अर्धशतकानंतर त्याने हे अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने 28 चेंडूंमध्ये शतक आणि अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले होते. या खेळीसह, त्याने लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील सर्वात जलद 50, 100, 150 आणि 200 धावांचे विक्रम मोडीत काढले आहेत. तसेच, त्याने बिहारसाठी केलेली आपली 150 धावांची पूर्वीची सर्वोच्च धावसंख्याही मागे टाकली.

दरम्यान,  सामन्यानंतर बोलताना सूर्यवंशीने म्हणाला की, “मला थोडा दबाव जाणवतो. हे सामान्य आहे, थोडे दडपण येणे हा मानवी स्वभाव आहे. पण दोन-चार चेंडूंनंतर मी शांत होतो आणि पुन्हा सामान्य होतो. खूप छान वाटत आहे. मला माझी लय परत सापडली आहे, त्यामुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये मी तीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आशा आहे की, आम्ही उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरीत पोहोचू आणि मी त्याच लयीत आणि शैलीत खेळत राहीन.”

Follow Us
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर