Fact Check | येत्या 3 मे पासून देशात लॉकडाऊनची चर्चा, मेसेजमधील दावा खरा की खोटा?

| Updated on: May 01, 2021 | 1:01 PM

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याचा दावा केला जात आहे. (Fact Check Lockdown From 3 May Message Viral)

Fact Check | येत्या 3 मे पासून देशात लॉकडाऊनची चर्चा, मेसेजमधील दावा खरा की खोटा?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशभरात पूर्णपणे लॉकडाऊन लावावा, अशी मागणी केली जात आहे. याबाबत सोशल मीडियावर विविध मेसेज व्हायरल होत आहे. यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या दाव्यामागील नेमकं सत्य काय? याच्यामागील वास्तव्य समोर आले आहे. (Fact Check PM Modi Planning to Impose Lockdown From 3 May Message Viral)

व्हायरल मेसेजमधील दावा काय?

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 3 मेपासून 20 मेपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. असा मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये एका चॅनेलची स्क्रिन दिसत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. यात केंद्र सरकारने 3 मेपासून 20 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्यांनी लॉकडाऊनबाबत तयारी दर्शवली आहे. याबाबतच्या नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहे, असा दावा या फोटोतून करण्यात आला आहे.

दावा खरा की खोटा?

इंटरनेटवर व्हायरल होणारा हा मेसेज खरा आहे की खोटा? याची PIB च्या फॅक्ट चेक युनिटने पडताळणी केली. याची सखोल चौकशी केल्यानंतर हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा दावा बनावट आहे. केंद्र सरकारने 3 मे ते 20 मे दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची घोषणा केल्याचा दावा PIB ने खोटा असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही, असे पीआयबीने सांगितले आहे.

मेसेज खरा की खोटा? चेक कसं कराल?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विविध मेसेज व्हायरल होत आहेत. यात अनेक दावे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर तुम्हालाही कोणतीही बातमी किंवा माहितीत दिलेल्या तथ्याबद्दल शंका असल्यास तुम्ही ते पीआयबी फॅक्टचेकवर पाठवू शकता. याची सखोल चौकशी केली जाईल. ही चौकशी केल्यानंतर तुम्हाला याची योग्य ती माहिती दिली जाईल.

याद्वारे आपण विविध माध्यमांद्वारे पीआयबी फॅक्टचेक करु शकतो. त्याशिवाय तुम्ही +91 8799711259 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा socialmedia@pib.gov.in वर ईमेल करु शकता. या व्यतिरिक्त आपण ट्विटरवर @PIBFactCheck, इंस्टाग्रामवर /PIBFactCheck किंवा फेसबुकवर /PIBFactCheck देखील संपर्क साधू शकता. (Fact Check PM Modi Planning to Impose Lockdown From 3 May Message Viral)

संबंधित बातम्या :

Free Corona Vaccination | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अचूक तपासणी, दोन तासात रिपोर्ट, टाटा समूहाकडून कोरोना चाचणीचे नवीन तंत्रज्ञान विकसित