अचूक तपासणी, दोन तासात रिपोर्ट, टाटा समूहाकडून कोरोना चाचणीचे नवीन तंत्रज्ञान विकसित

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानातील सामंजस्य करारातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारी भारतातील पहिली लॅब ठरली आहे.(CRISPR–Cas technology)

अचूक तपासणी, दोन तासात रिपोर्ट, टाटा समूहाकडून कोरोना चाचणीचे नवीन तंत्रज्ञान विकसित
क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधित आकडा लक्षात घेता टाटा समूहाने कोरोना तपासणीसाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. यामुळे आता रुग्णांचा स्वॅब जास्त अचूक आणि गतीने मिळणार आहे. (Tata Group develops CRISPR–Cas technology for corona testing)

मुंबईत कोरोनाची तपासणी करण्याकरिता टाटा समूहाने आता क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान आणले आहे. त्यामुळे रुग्णांचा स्वॅब जास्त अचूक आणि गतीने मिळणार आहे. सद्यस्थितीत मुंबई आणि पुण्यात अशा दोन ठिकाणी या तंत्रज्ञानाद्वारे चाचणी केली जात आहे. येत्या शुक्रवारपासून याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुण्यात ही लॅब सुरु केली जाणार आहे. हे तंत्रज्ञान टाटा उद्योग समूहाने विकसित केले आहे. त्यामुळे क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानातील सामंजस्य करारातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारी भारतातील पहिली लॅब ठरली आहे.

काय आहे क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान? 

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचे निदान अचूक आणि कमी वेळात होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे कोविड -१९ मधील कोरोनाबाबत निदान करण्याची अचूकता आता कित्येक पटीने वाढणार आहे. तसेच अँटिजेन टेस्टिंग आणि आरटी-पीसीआर तपासणीपेक्षा या तंत्रज्ञानाने होणारी तपासणी कित्येक पटीने अचूक राहणार आहे.

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वॅब घेतल्यापासून दोन ते तीन तासात रिपोर्ट येतो. याद्वारे रोज कमीत कमी 500 ते 2000 तपासण्या 24 तासात एका लॅबमध्ये केल्या जाऊ शकतात. तसेच स्वॅब घेणाऱ्यांकडे मोबाईलवर एक ॲप तयार करून दिले आहे. त्यात त्याची माहिती भरल्यानंतर ज्यावेळी रिपोर्ट तयार होतो. तेव्हा तो रुग्णाच्या मेलवर किंवा मोबाईलवर आणि आयसीएमआरच्या पोर्टलवर एकाच वेळी जातो. त्यामुळे यात वेळेची बचत होते.

चाचणी नेगिटिव्ह की पॉझिटिव्ह हे कसं समजणार?

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युके, साऊथ आफ्रिकन, ब्राझिलियन व्हेरियंट देखील सहजपणे तपासता येणार आहेत. तसेच आरटीपीसीआर तपासणी करताना रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे शोधण्यासाठी जो स्कोअर देण्यात येतो तसाच तो येथेही देण्यात आला आहे.

जर तो स्कोअर 10 पेक्षा खाली आला तर तो रुग्ण निगेटिव्ह असेल. जर 10 ते 20 च्या मध्ये आला तर तो काठावर पॉझिटिव्ह असेल आणि 20 च्या वर आला तर तो पूर्णपणे पॉझिटिव्ह असेल, असा अर्थ या चाचणीतून निघेल, अशी माहिती लॅब व्यवस्थापक मनाली सासणे यांनी दिली आहे.  (Tata Group develops CRISPR–Cas technology for corona testing)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी: रायगडमध्ये 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस; इंजेक्शन्सचा वापर थांबवण्याचे आदेश

मुंबई हादरली! टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक

लसीकरण केंद्राचा मेसेज आल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं आवाहन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI