नवा ट्विस्ट, फॅन मोदींचा अन् जेवणाचे आमंत्रण केजरीवालांना, ‘त्या’ घटनेमागचे नेमके सत्य काय?

18 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गुजरातच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, तेथील एका रिक्षाचालकाने त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिले होते. त्यामागचे नेमके कारण काय हे आता समोर आले आहे.

नवा ट्विस्ट, फॅन मोदींचा अन् जेवणाचे आमंत्रण केजरीवालांना, 'त्या' घटनेमागचे नेमके सत्य काय?
अरविंद केजरीवालांना घरी जेवणासाठी बोलवणाऱ्या त्या रिक्षाचालकाचे खऱे वास्तव काय?
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 7:36 PM

दिल्ली : बरोबर 20 दिवसांपूर्वी अहमदाबादचा एक रिक्षावाला (Rickshaw driver) चांगलाच चर्चेत आला होता, त्याला निमित्त ठरले ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) . केजरीवाल पक्ष संघटनासाठी अहमदाबादच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, एका रिक्षाचालकाच्या घरी जेवणासाठी ते निघाले होते. ते ही त्याच्याच रिक्षामध्ये. मात्र, सुरक्षतेच्या कारणावरुन पोलिसांनी (Police) त्यांना रोखले आणि तो रिक्षाचालक देखील चांगलाच चर्चेत आला होता. आता एवढी पार्श्वभूमी का सांगितली असा प्रश्न पडला असेल. पण त्याला कारणही तसेच आहे. आता 20 दिवसानंतर केजरीवालांना जेवण्यासाठी घरी नेले त्याच्यामागचे कारण सांगितले आहे. आपण तर मोदींचाच फॅन आहे पण रिक्षा संघाच्या सांगण्यावरुन मी केजरीवालांना जेवण्यासाठी घरी नेल्याचे सांगितले आहे.

पंतप्रधान हे अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. येथील रॅलीच्या दरम्यान तो रिक्षाचालक मिडियाच्या नजरेत आला. अरविंद केजरीवालांना जेवणासाठी घरी घेऊन गेलेला त्यांचा जबरा फॅन मोदींच्या रॅलीत कसा? प्रश्न पत्रकारांना पडला. त्यावर रिक्षाचालकानेच आपण मोदींचाच फॅन असल्याचे सांगितले.

त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मग त्या दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुम्ही घरी जेवणासाठी नेले त्याचे काय? असा प्रश्न समोर येताच मी नरेंद्र मोदींचा फॅन आहे. आणि मी रिक्षा संघाच्या सांगण्यावरुन केजरीवालांना घरी जेवायला नेल्याचे त्या रिक्षाचालकाने स्पष्ट केले आहे.

मध्यंतरी एका रिक्षाचालकाच्या घऱी जेवणासाठी केजरीवाल हे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यामुळे केजरीवाल किती तळागळाला पोहचले असल्याचे स्पष्ट झाले होते. पण आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांना जेवण्यास बोलावल्याचे रिक्षा चालकाने सांगितले.

मात्र, यावरुनही एवढे राजकारण होईल असे आपल्याला वाटलेच नाही. मात्र, मी सुरवातीपासून मोदींचाच फॅन आहे आणि भविष्यातही राहणार असल्याचे त्या रिक्षाचालकाने सांगितले आहे. रिक्षा संघाच्या सांगण्यावरुन ते कृत्य केले असेही तो म्हणाला आहे.

18 दिवसांपूर्वी केजरीवाल गुजरात दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी रिक्षा चालकांचा मेळावा घेतला होता. मात्र, यामधीलच घाटलोडिया येथील रिक्षाचालकाच्या घरी ते जेवायला गेले होते.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.