AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गहलोत तो जादुगार है… जाता जाता सचिन पायलटांचा गेम? हातातला कागद पाहिला का?

राजस्थानात घडल्या प्रकारामुळे पक्षाध्यक्ष सोनिया गांधींसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते नाराज आहेत. आता मुख्यमंत्री पदही गहलोत यांना मिळेल की नाही, अशी शंका आहे. त्यातच सोनियांच्या भेटीपूर्वी गहलोत यांच्या हातातील कागद नव्याने चर्चेचा विषय ठरतोय.

गहलोत तो जादुगार है... जाता जाता सचिन पायलटांचा गेम? हातातला कागद पाहिला का?
अशोक गहलोत यांच्या हातातील कागदावरचा मजकूर चर्चेतImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 30, 2022 | 8:45 PM
Share

जयपूरः राजस्थानच्या राजकारणातले (Rajasthan politics) जादूगार अशी ओळख असलेले अशोक गहलोत (Ashok Gehlot) आपल्याच कारनाम्यांमुळे घेरले गेल्याची चर्चा आहे. काल सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची गहलोतांनी भेट घेतली. राजस्थानमध्ये घडल्या प्रकाराबाबत आपण दुःखी असल्याचं म्हटलं. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदातूनही बाहेर पडल्याची घोषणा केली. एकूणच अशोक गहलोत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजस्थानचं मुख्यमंत्रीपदही गहलोत यांच्या हातून जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

पण माध्यमांच्या कॅमेऱ्यानं एक कागद असा टिपलाय, ज्यात गहलोत यांनी अजूनही हार मानलेली दिसत नाहीये. सोनिया गांधींशी भेट घेण्यापूर्वी त्यांच्या हातातला कागद बरेच मुद्दे उघड करतोय… हाच कागद पुन्हा एकदा गहलोतांच्या हातातली जादुची कांडी ठरेल की काय, असं म्हटलं जातंय…

कारणही तसंच आहे. सोनिया गांधींसोबतच्या भेटीत काय बोलायचं यासंबंधीचे मुद्दे गहलोतांनी या कागदावर लिहिलेत, असा अंदाज वर्तवला जातोय.

राजस्थान आणि दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात हा कागद तुफान व्हायरल होतोय. गहलोतांनी राजस्थानचं नेतृत्व कोण करणार, हा निर्णय सोनियांकडे सोपवला खरा. पण राजस्थानमधलं आकड्यांचं गणित काय आहे, हेही सोनियांना सांगितलं असावं, असं या कागदावरून स्पष्ट होतंय.

गहलोत यांच्या हातातल्या या कागदावर बारकाइनं पाहिलं तर त्यात 102 vs 18… या पॉइंटवरून चर्चा सुरु झाल्याचं म्हटलंय. अर्थ काढायचा झाला तर गहलोत यांच्याकडे 102 आणि सचिन पायलट यांच्या गटात 18 आमदारांचं पाठबळ असल्याचं त्यावर लिहिलं असावं…

याचा अर्थ स्पष्ट आहे. पक्षात आपल्याला जास्त बहुमत आहे, हेच गहलोतांनी सोनियांसमोर सांगितलं असावं.

त्यातले SP will leave, 10cr BJP, गुंडागर्दी आदी शब्दांचे अर्थ नेमके काय यावरून सोशल मीडियावर मत-मतांतरं उमटत आहेत.

सध्या तरी कागदावरून तर स्पष्टच दिसतंय की अशोक गहलोत अजूनही मुख्यमंत्री पदावरचा दावा सहजा सहजी सोडणार नाहीत. त्यामुळे राजस्थानात पुन्हा एकदा अशोक गहलोतांची जादू चालणार, असा सूर उमटतोय.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव चर्चेत होतं. मात्र अध्यक्ष पद मिळत असलं तरीही राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर आपल्याच गटातील नेता बसवण्यासाठी गहलोत गटातील आमदारांनी मोठं राजीनामा सत्र घडवून आणलं. कोणत्याही स्थितीत गहलोतांना काँग्रेसचेच नेते सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पद मिळू द्यायचं नव्हतं.

घडल्या प्रकारामुळे पक्षाध्यक्ष सोनिया गांधींसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते नाराज आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदही गहलोत यांना मिळेल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यातच सोनियांच्या भेटीपूर्वी गहलोत यांच्या हातातील कागद नव्याने चर्चेचा विषय ठरतोय.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.