गहलोत झाले, पायलट झाले आता थेट ‘या’ आमदारांनाच काँग्रेसचा इशारा

महादेव कांबळे, Tv9 मराठी

|

Updated on: Sep 29, 2022 | 9:50 PM

काँग्रेसमध्ये 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेवर गेहलोत समर्थक हायकमांडसमोर आपली चूक मान्य करून डॅमेज कंट्रोल करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

गहलोत झाले, पायलट झाले आता थेट 'या' आमदारांनाच काँग्रेसचा इशारा

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडीवरून पक्षांतर्गत घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यामुळे राजस्थान काँग्रेसममध्ये जोरदार गदारोळ माजला आहे. राजस्थानातील राजकीय गदारोळामुळे अशोक गहलोतांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची राहणार की जाणार याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. एकीकडे ही परिस्थिती चालू असतानाच केरळमधील मलप्पुरममध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या जवळचे आणि काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (k c Venugopal) यांनी दोन दिवसातच परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचे सांगितले होते.

केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार येत्या एक-दोन दिवसांतच स्पष्ट होईल. हे त्यांनी सांगत असतानाच के. सी. वेणुगोपाल यांनी एका पत्राद्वारे जाहीर केले आहे की, नेत्यांनी पक्षातील अंतर्गत बाबी आणि पक्षातील नेत्यांच्या विरोधात वक्तव्य करु नये असंही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रामध्ये सांगितले आहे की, पक्षाच्या अंतर्गत बाबी आणि पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्ये करू नये.

अशी वक्तव्य केली गेली तर मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेहलोत आता डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. मात्र, गेहलोत यांच्या हातातून सत्ता जात असल्याचेही स्पष्ट पणे दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांची खुर्ची गेहलोत यांच्याकडे राहते का हे जाते ते काही काळातच स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसमध्ये 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेवर गेहलोत समर्थक हायकमांडसमोर आपली चूक मान्य करून डॅमेज कंट्रोल करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

तर दुसरीकडे सचिन पायलटही सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी आतूर आहेत. तर आता अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले असून राजस्थानच्या राजकीय घडामोडींमुळे अशोक गेहलोतांच्या हातातून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार 22 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

8 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI