Tamilnadu Murder : जन्मदात्याची भितींवर डोके आपटून केली हत्या; तामिळनाडूतील 20 वर्षीय तरुणाचा प्रताप

आरोपी तरुणाला कमी वयातच दारूचे प्रचंड व्यसन जडले होते. ह्याच व्यसनातून त्याने पित्याचा छळ सुरु केला होता. मणिकंदन असे आरोपीचे नाव असून त्याला कामधंदा नसल्यामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याने 60 वर्षीय वडील वेणू यांची हत्या केली.

Tamilnadu Murder : जन्मदात्याची भितींवर डोके आपटून केली हत्या; तामिळनाडूतील 20 वर्षीय तरुणाचा प्रताप
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 1:41 AM

चेन्नई : ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा। त्याचा तिही लोकी झेंडा’ असे म्हटले जाते. जन्मदात्या बापाला आपल्या पुत्राकडून उत्तुंग कामगिरीची अपेक्षा असते खरी पण अनेकदा मुलाची गुन्हेगारी जन्मदात्याच्या साऱ्या स्वप्नांवर पाणी फेरते. तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने याचीच प्रचिती आणली आहे. जन्मदात्याला घराच्या भिंतीवर डोके आपटून ठार (Murder) केल्याची भयानक घटना उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, हा अतिरेक 60 वर्षीय बापा (Father)च्या 20 वर्षीय मुला (Son)ने केल्याने परिसरात सगळेच हादरून गेले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली. माणिकंदन असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Father killed by 20-year-old in Tamil Nadu by hitting the head on the walls)

दारूच्या नशेत पित्याला वारंवार मारहाण करायचा!

आरोपी तरुणाला कमी वयातच दारूचे प्रचंड व्यसन जडले होते. ह्याच व्यसनातून त्याने पित्याचा छळ सुरु केला होता. मणिकंदन असे आरोपीचे नाव असून त्याला कामधंदा नसल्यामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याने 60 वर्षीय वडील वेणू यांची हत्या केली. वेणू यांच्या पत्नीचे म्हणजेच आरोपीच्या आईचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर वेणू हे मुलगा मणिकंदन याच्यासोबत राहत होते. आरोपी तरुण नियमित दारू प्यायचा. काही वेळा त्याने वडिलांकडून जबरदस्तीने पैसे घेण्यासाठी त्यांना मारहाण केल्याचे अधिक चौकशीत समोर आले आहे.

वडिलांच्या हत्येनंतर मृतदेहासोबत झोपला आरोपी तरुण

आरोपी तरुणाने रागाच्या भरात वडिलांचे डोके भिंतीवर आपटले. यात वडील वेणू हे बेशुद्ध पडले, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. धक्कादायक म्हणजे त्या रात्री आरोपी तरुण मृतदेहासोबतच झोपी गेला. त्याला वडिलांचा मृत्यू झाल्याची कल्पना नव्हती. वडिलांचा आपण केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे तरुणाला दुसऱ्या दिवशी पहाटे कळले, असे ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. या धक्कादायक घटनेनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. नंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी आरोपी मणिकंदनला पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. (Father killed by 20-year-old in Tamil Nadu by hitting the head on the walls)

इतर बातम्या

Pegasus : पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर

Lakhimpur Kheri Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान; मृत शेतकर्‍यांचे कुटुंबिय सर्वोच्च न्यायालय