JNU Violence LIVE: जेनएयूत नेमकं काय घडलं, जाणून घ्या राड्यामागची पाच कारणे

| Updated on: Apr 11, 2022 | 11:33 AM

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी संध्याकाळी उशिरा डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये (JNU Student) हिंसक संघर्ष झाला. त्यामध्ये 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रामनवमी आणि नॉनव्हेज खाण्यावरून गदारोळ झाला आहे. त्यानंतर कावेरी हॉस्टेलच्या (Kaveri Hostel) मेसमध्ये हाणामारी झाली. काही वेळात अखिल भारतीय छात्र परिषदेचे (ABVP) विद्यार्थी पत्रकार परिषद घेणार आहेत.

JNU Violence LIVE: जेनएयूत नेमकं काय घडलं, जाणून घ्या राड्यामागची पाच कारणे
जेनएयूत नेमकं काय घडलं, जाणून घ्या राड्यामागचं पाच कारणे
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी संध्याकाळी उशिरा डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये (JNU Student) हिंसक संघर्ष झाला. त्यामध्ये 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रामनवमी आणि नॉनव्हेज खाण्यावरून गदारोळ झाला आहे. त्यानंतर कावेरी हॉस्टेलच्या (Kaveri Hostel) मेसमध्ये हाणामारी झाली. काही वेळात अखिल भारतीय छात्र परिषदेचे (ABVP) विद्यार्थी पत्रकार परिषद घेणार आहेत. झालेल्या घडामोडीबाबत ते आपली बाजू मांडणार आहेत. याशिवाय डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी संघटना दुपारी दोन वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयाचा घेराव घालणार आहेत.

दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून JNU विद्यार्थी संघटना, SFI, DSF आणि AISA यांच्यातील हिंसक संघर्षाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कलम 323/341/509/506/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणते विद्यार्थी दुखावले आहेत. त्याचा तपशील आता गोळा केला जात आहे.

जाणून घ्या राड्यामागचं कारणे

  1. जेएनयूच्या कावेरी हॉस्टेलच्या मेसमध्ये एका बाजूला इफ्तार पार्टी सुरू होती. तर दुसऱ्या बाजूला रामनवमी साजरी करण्यात येत होती. त्यावेळी दोन गटात मारामारी झाली
  2. भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी काल चार ते पाच वाजणाच्या सुमारास मेसमधील मांसाहारी जेवण बंद करण्याची धमकी दिली होती. तसेच तिथून एका चिकन विक्रेत्याला सुध्दा पळवून लावलं होतं. तसेच मेस कमिटीमधील काही सदस्यांनी सुध्दा हमला केला होता.
  3. डाव्या विचारणीच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांची पसंतीचा जेवण असायला हवं असं सांगितलं. साधारण साडेसात वाजणाच्या सुमारास भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही गुंडे काही विद्यार्थ्यांना मारहाण करीत असल्याचे पाहायला मिळाले.
  4. एनएस बालाजी यांनी सांगितले की, काही विद्यार्थी हॉस्टेलच्या गेटवरती होते. तर काही विद्यार्थी ट्यूब लाईट आणि झाडांवरती दगड मारण्याचं काम करीत होते. काही लोकांनी तिथल्या महिलांशी गैरवर्तन केल्याचं सुध्दा सांगितलं आहे.
  5. जेएनयू प्रशासनाने आता कथित मांसाहार बंद करण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जेएनयू प्रशासनाने कावेरी वसतिगृहाच्या वॉर्डन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांची बाजूही जाणून घेतली जाणार आहे. दोषी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Sanjay Raut: सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात सामिल होऊ नका अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल; राऊतांचा राज्यपालांना इशारा

भोंग्यावरून मनसेमधली खदखद तीव्र; आता धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांचा राजीनामा

Nanded | बिल्डर Sanjay Biyani हत्याकांडाचे गूढ उकलणार? बियाणींचा गहाळ मोबाइल सापडला, तपासाकडे महाराष्ट्राचे लक्ष!