Sanjay Raut: सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात सामिल होऊ नका अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल; राऊतांचा राज्यपालांना इशारा

भाजप नेते किरीट सोमय्यांना (kirit somaiya) अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून राजभवनात (raj bhavan) सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक जात आहेत.

Sanjay Raut: सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात सामिल होऊ नका अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल; राऊतांचा राज्यपालांना इशारा
सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात सामिल होऊ नका अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल; राऊतांचा राज्यपालांना इशारा
Image Credit source: tv9 marathi
गिरीश गायकवाड

| Edited By: भीमराव गवळी

Apr 11, 2022 | 10:40 AM

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्यांना (kirit somaiya) अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून राजभवनात (raj bhavan) सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक जात आहेत. जुन्या तारखेचे कागदपत्रं तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये. देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला. सोमय्या आणि त्यांच्या टोळीने लोकांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेला हा घोटाळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती मोठी आहे. राज्याबाहेरही या घोटाळ्याचं लोण आहे. त्यामुळे हे दोन्ही लफंगे बापबेटे लपून बसले आहेत. अंतरीम जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. केंद्रातून सेटिंग करत आहेत. मात्र, त्यांना जामीन मिळणार नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियशी संवाद साधताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हा इशारा दिला आहे. एक माफिया गँग आता बोगस पुरावे तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो जर चुकीचं काम केलं तर राजभवनाची उरलेली इभ्रतही संपेल. सोमय्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न होत आहेत. पण गुन्हेगार कुठेही असो मुंबई पोलीस त्यांना पकडणारच, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

अजूनही प्रकरणे बाहेर काढणार

मी पोलीस तपासाबाबत बोलणार नाही. पोलीस त्यांचा तपास करत आहे. काही लोकांची चौकशीही सुरू झाली आहे, असं सांगतानाच अजूनही काही प्रकरणे बाहेर येणार आहे, असा दावा सोमय्या यांनी केला.

घोटाळ्याची व्याप्ती मोठी

सेव्ह विक्रांतच्या नावावर जो घोटाळा झाला तो काही छोटा घोटाळा नाहीये. त्याची व्याप्ती मोठी आहे. पूर्ण महाराष्ट्रातून पैसा गोळा करण्यात आला. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी ही वसुली केली. त्यांची माफिया टोळी आहे. बिल्डरांकडूनही ते पैसे जमा करतात. इतर राज्यातूनही पैसा गोळा केला. त्याचा गैरव्यापर झाला आहे. इओडब्ल्यूकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. कालपासून स्टेटटमेंट सुरू झालं. असं कळलं. मी काही पोलिसांचा प्रवक्ता नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut: महाराष्ट्रातील एका नेत्याच्या इशाऱ्यावर ईडीच्या कारवाया; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Latur : उदगीर नगरीत साहित्य संमेलनाची लगबग, संमेलनाच्या यशस्वतेसाठी असा हा ‘लातूर पॅटर्न’

Arvind Sawant : मुंबई केंद्रशासित करण्याची हिंमत करून दाखवा, मग बघाच, अरविंद सावंत यांचा इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें