AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : उदगीर नगरीत साहित्य संमेलनाची लगबग, संमेलनाच्या यशस्वतेसाठी असा हा ‘लातूर पॅटर्न’

95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन जिल्ह्यातील उदगीर नगरीत होणार आहे. त्याअनुशंगाने उदगीर शहरात तयारी सुरु झाली असून या तीन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे. त्याअनुशांने स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा आणि दरम्यानच्या काळात मान्यवरांची उपस्थिती याअनुशंगाने लातूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. लातूर हे एक शांतताप्रिय जिल्हा असून अशा साहित्यिक कार्यक्रमामध्ये राजकीय मतभेद बाजूला सारुन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते समोर येणार आहेत.

Latur : उदगीर नगरीत साहित्य संमेलनाची लगबग, संमेलनाच्या यशस्वतेसाठी असा हा 'लातूर पॅटर्न'
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. त्याअनुशंगाने पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींची उपस्थिती होती.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 10:12 AM
Share

लातूर :  95 वे अखिल भारतीय (Sahitya Samelan) साहित्य संमेलन जिल्ह्यातील (Udgir) उदगीर नगरीत होणार आहे. त्याअनुशंगाने उदगीर शहरात तयारी सुरु झाली असून या तीन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे. त्याअनुशांने स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा आणि दरम्यानच्या काळात मान्यवरांची उपस्थिती याअनुशंगाने लातूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. (Latur) लातूर हे एक शांतताप्रिय जिल्हा असून अशा साहित्यिक कार्यक्रमामध्ये राजकीय मतभेद बाजूला सारुन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते समोर येणार आहेत. याची प्रचिती संमेलनाच्या अनुशंगाने पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आली आहे. यावेळी भाजपाचे आमदार,खासदार, काँग्रेसचे महापौर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

उद्घाटन पवारांच्या हस्ते तर समारोपाला राष्ट्रपतींची उपस्थिती

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये हे 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. 22 एप्रिल रोजी उद्घाटन होणार असून तीन दिवसीय संमेलन असणार आहे. संमेलनाचे उद्घाटन हे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. तर तर समारोपाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे उपस्थित आसनार आहेत. या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच पर्यावरणावर परिसंवाद आयोजित केला गेला आहे. उदयगिरी महाविद्यालयत 22, 23 आणि 24 एप्रिल दरम्यान हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.

असे असणार आहे नियोजन

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर हे संमलेन होत असल्याने अनेकांची उपस्थिती लाभणार आहे. देशभरातील 1 हजार पेक्षा जास्त मराठी साहित्यिक आणि कवी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उदगीर, लातूर, बिदर आणि नांदेड येथे राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातला उन्हाळा आणि अवकाळी पावसाचा शक्यता लक्षात घेउन मंडप व्यवस्था करण्यात आली आहे . जवळपास 36 एकर परिसरात मंडप व्यवस्था उभी करण्यात येत आहे. मुख्य मंडपात 5000 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेचे वेगळेपण

95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुशंगाने लातूर येथे पत्रकार परिषद पार पडली असून या परिषदेला सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींची उपस्थिती होती. शिक्षणात लातूर पॅटर्नची वेगळी ओळख आहेच पण शांतताप्रिय जिल्हा म्हणूनही लातूरकडे पाहिले जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर नगरीत होत असून ते यशस्वीपणे पार पाडणे ही प्रत्येक लातूरकराची जबाबदारी आहे. म्हणूनच पत्रकार परिषदेला भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या लोकप्रतिनीधींची उपस्थिती होती. यावळे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांनी संमेलनाची रुपरेषा सांगितली.

इतर बातम्या :

विक्रांतसाठी ज्या दलालाने पैसे खाल्ले, तुम्ही त्याची बाजू घेता, मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांचा खरपूस समाचार

Tourist places : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चांगला वेळ घालवण्यासाठी या ठिकाणांना नक्की भेट द्या!

Face Check | व्यवहारापूर्वी एटीएमवर दोनदा Cancel बटण दाबा, पिन चोरीचे टेन्शन नाही, दावा खरा?

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.