Face Check | व्यवहारापूर्वी एटीएमवर दोनदा Cancel बटण दाबा, पिन चोरीचे टेन्शन नाही, दावा खरा?

पत्र सूचना कार्यालय अर्थात पीआयबीने, व्यवहारापूर्वी एटीएम मशीनवर दाबा दोनदा Cancel बटन; नका घेऊ पिन चोरीचे टेन्शन या समाज माध्यमावर फिरणा-या संदेशाची पोलखोल केली आहे. व्यवहारापूर्वी सतर्कता बाळगणे आणि माहिती गोपनिय ठेवणे हीच खरी एटीएमचा गैरवापरापासून रोखण्याची गुरुकिल्ली असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

Face Check | व्यवहारापूर्वी एटीएमवर दोनदा Cancel बटण दाबा, पिन चोरीचे टेन्शन नाही, दावा खरा?
मृणाल पाटील

|

Apr 11, 2022 | 9:55 AM

मुंबई : समाज माध्यमांवर आणखी एका संदेशाने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल मॅसेज मध्ये दावा करण्यात आला आहे की, एटीएममध्ये व्यवहार (ATM Transaction) करण्यापूर्वी ग्राहकांनी एटीएम मशीनवरील Cancel बटन दोनदा दाबल्यास कोणीही तुमचा एटीएम पिन हॅक करु शकत नाही, चोरी करु शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India) नावाने हा संदेश व्हायरल करण्यात आला आहे. या संदेशाची पत्र व्यवहार कार्यालयाने अर्थात पीआयबीने सत्यता तपासली आहे. त्यानुसार, हा दावा सपशेल खोटा ठरला आहे. पीआयबीने (PIB) स्पष्ट केल्यानुसार, असा कोणताही मॅसेज आरबीआयकडून देण्यात आलेला नाही. पत्र सूचना कार्यालय अर्थात पीआयबीने, व्यवहारापूर्वी एटीएम मशीनवर दाबा दोनदा Cancel बटन; नका घेऊ पिन चोरीचे टेन्शन या समाज माध्यमावर फिरणा-या संदेशाची पोलखोल केली आहे. व्यवहारापूर्वी सतर्कता बाळगणे आणि माहिती गोपनिय ठेवणे हीच खरी एटीएमचा गैरवापरापासून रोखण्याची गुरुकिल्ली असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

भारतीय पत्र सूचना कार्यालय समाज माध्यमात भ्रम, अफवा पसरविणा-या अशा संदेशाची शहानिशा करत असते. सरकारी योजना, सूचना अथवा बातम्यासंबंधी अफवा पसरवत असेल तर त्याची शहानिशा करुन त्याविषयीची सत्यता पीआयबी सर्वांसमोर आणते. पीआयबीकडे यासाठी एक सतर्क टीम असून ती समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणा-या अशा खोट्या मॅसेजवर लक्ष्य ठेऊन त्यापासून नागरिकांना परावृत्त करते. तसेच ते अफवेचे बळी ठरु नये याची काळजी घेते. एटीएमविषयक या मॅसेजची पीआयबीने सत्यता पडताळली असून हा संदेश आरबीआयने पाठविला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय आहे व्हायरल संदेश
एटीएममध्ये व्यवहार करण्यापूर्वी ग्राहकांनी एटीएम मशीनवरील Cancel बटन दोनदा दाबल्यास कोणीही तुमचा एटीएम पिन हॅक करु शकत नाही, चोरी करु शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नावाने हा संदेश व्हायरल करण्यात आला आहे, असा दावा करणारा संदेश सध्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने याविषयीची शहानिशा केल्यानंतर केंद्रीय बँकेने अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना नागरिकांना केल्या नसल्याचे समोर आले आहे. पीआयबीने नागरिकांना उलट या संदेशाला बळी न पडता सुरक्षित व्यवहारासाठी तुमच्या एटीएम कार्डवर पिन क्रमांक न टाकण्याचा आणि तो कोणाशीही शेअर न करण्याचा तसेच तो गोपनिय ठेवण्याचा सल्ला पीआयबीने नागरिकांना दिला आहे.

तुम्हीपण करु शकता शहानिशा
पीआयबी फॅक्ट चेक टीम समाज माध्यमांवरील अनेक अशा पोस्टचा समाचार घेत असते. त्यांची शहानिशा करुन त्यांचा खरेखोटेपणा समोर आणत असते. तुम्हाला अनेक दाव्यांची सत्यता तपासायची असेल तर तुम्ही +918799711259 या क्रमांकावर व्हाट्सअप करु शकता अथवा socailmedia@pib.gov.in या ईमेलवर मेल करु शकता. तसेच पीआयबीच्या ट्विटर हँडलवर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर पोस्टची शहानिशा करु शकता.

संबंंधीत बातम्या

Aurangabad | “दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत…” कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओवर तृप्ती देसाईंचं परखड मत

Chanakya Niti | सावधान ! आयुष्यातील 5 घटना देताता आर्थिक संकटाचे संकेत, आताच सावध व्हा

Aurangabad | औरंगाबादेत कोरोना आटोक्यात, पण लसीकरणासाठी मनपा आग्रही, घरी जाऊन दुसरा डोस देणार!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें