Aurangabad | “दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत…” कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओवर तृप्ती देसाईंचं परखड मत

औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका कीर्तनकाराचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका महिला कीर्तनकारासोबत तो शारीरिक संबंध ठेवत असतानाच्या दोन व्हिडीओ क्लिप समोर आल्या आहेत.

Aurangabad | दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत... कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओवर तृप्ती देसाईंचं परखड मत
Trupti DesaiImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 7:59 AM

पुणे : महिलेसोबत केलेल्या संभोगाचा व्हिडीओ व्हायरल (Aurangabad Viral Video) केल्याप्रकरणी कीर्तनकारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन करत तृप्ती देसाईंनी मागणी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकाराने (Kirtankar) महिला कीर्तनकारासोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्याची ही कृती कीर्तनकार पेशा, महिलांची प्रतिष्ठा आणि सामाजिक नीतीमूल्ये यांना पायदळी तुडवणारी असल्याची टीका देसाईंनी केली आहे. या कीर्तनकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडने केली आहे. दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत जी नैसर्गिक क्रिया केली आहे, त्याचा सार्वजनिक व्हिडीओ चित्रित करुन व्हायरल करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे, असंही त्या म्हणाल्या.

तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

“औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकाराचा महिला कीर्तनकारासोबत संभोग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खरं तर, दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत जी नैसर्गिक क्रिया केली आहे, त्याचा सार्वजनिक व्हिडीओ चित्रित करुन व्हायरल करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. जे कीर्तनकार उपदेश देतात, समाज प्रबोधन करतात, तेच जर असे विकृत वागायला लागले, तर त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे.” असं मत तृप्ती देसाईंनी व्यक्त केलं.

“गृहमंत्र्यांना मी लेखी निवेदन दिलं आहे. सायबर कलम 66अ, 67अ आणि भादंवि कलम 292 नुसार त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायाला गालबोट लागत आहे, कीर्तनकारांची बदनामी होत आहे, त्यामुळे वारकरी संघटनांनीही त्यांच्या कारवाई करत ‘हभप’, ‘भागवताचार्य’ अशी पदवी काढून घेतली पाहिजे आणि कीर्तनास बंदी घातली पाहिजे, असे व्हिडीओ थांबले पाहिजेत, यासाठी गुन्हा दाखल व्हावा” अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका कीर्तनकाराचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका महिला कीर्तनकारासोबत तो शारीरिक संबंध ठेवत असतानाच्या दोन व्हिडीओ क्लिप समोर आल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओतील कीर्तनकार महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध आहेत. यानंतर वारकरी संप्रदाय संघटनेकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

स्मृती इराणींना गॅस, पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या, ‘हु आर यू…’ विमानात पाहा काय घडलं?

ट्रॅफिक पोलिसाला रिक्षाची जोरदार धडक, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ…

VIDEO | आधी गप्पांचा व्हिडीओ, आता सुप्रिया सुळेंना टॅग करत थरुर यांनी बॉलिवूड गाणंच लिहिलं

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.