UK New Coronavirus Strain | चिंता वाढली! लंडनहून दिल्लीला आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह

| Updated on: Dec 22, 2020 | 11:27 AM

लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात 5 प्रवाशी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळलेत. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलंय.

UK New Coronavirus Strain | चिंता वाढली! लंडनहून दिल्लीला आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह
Follow us on

नवी दिल्ली : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा नाईट कर्फ्यू (Maharashtra Night Curfew) लागलेला असतानाच, चिंता वाढवणारी बातमी आहे (Five From London Tested Positive For COVID-19). लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात 5 प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एकूण 266 प्रवाशी त्या विमानात होते. विशेष म्हणजे इंग्लंडमध्येच कोरोनाचा घातक विषाणू सापडला आहे (New coronavirus strain in UK). त्या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे (Five From London Tested Positive For COVID-19).

महाराष्ट्रात खबरदारी, नाईट कर्फ्यू लागू

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (21 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात आज 22 डिसेंबर 2020 पासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यूरोपीयन देशांनीही या आधीच ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवेला बंदी घातली होती. भारत सरकारने ब्रिटनमधून येणारी विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद केल्या आहेत. काल रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा बंद होणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती (New Coronavirus Strain) आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसची नवी प्रजाती ब्रिटनमध्ये आढळली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर (Out Of Control) जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे (Five From London Tested Positive For COVID-19).

नवा कोरोना व्हायरस किती घातक?

कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळल्यामुळे जगभरात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो किती घातक असावा?, त्याच्या प्रसाराची क्षमता अशी अशावी?, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी बोलताना बीबीसीचे खास आरोग्यविषयक पत्रकार जेम्स लॅलेगर यांनी अधिक माहिती दिली आहे. “नव्या कोरोना व्हायरसला समजून घेण्यासाठी कोरोना व्हायरसमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. व्हायरसमध्ये झालेला बदल हा स्वाभाविक आहे. जास्त संक्रमणासाठी कोणताही व्हायरस स्व:तला बदलून घेत असतो. तसेच कोरोना व्हयरसच्या बाबतीत झाले आहे,” असे लॅलेगर यांनी सांगितलं.

Five out of 266 passengers at Delhi airport from London Tested Positive For COVID-19

संबंधित बातम्या :

कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ, भारतातही आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक

नव्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई सज्ज, लंडन रिटर्नवाल्यांची बडदास्त, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Night Curfew: महाराष्ट्रात आजपासून नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय