स्मित मच्छार खरे हिरो, भारताला तुमच्यावर गर्व.. नरेंद्र मोदी यांच्याकडून काैतुक, थेट विमानात..

फ्लायदुबईचा पायलट स्मित मच्छार याच्यावर जगभरातून काैतुक केले जात आहे. भारतीय पायलटने जे केले ते कदाचित कोणालाही समजले नसते. जगरातून त्याचे काैतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मित मच्छार यांचे काैतुक केले.

स्मित मच्छार खरे हिरो, भारताला तुमच्यावर गर्व.. नरेंद्र मोदी यांच्याकडून काैतुक, थेट विमानात..
Smit Machchhar Narendra Modi
| Updated on: Oct 01, 2026 | 9:10 AM

फ्लायदुबईचा पायलट स्मित मच्छार याने काल जे काही केले, ज्यानंतर जगभरातून त्याचे काैतुक होत आहे. स्वत:च्या जीवाची परवा न करता या भाई थेट विमानात भिडला. को पायलटला विमान क्रॅश करायचे होते. त्यामुळे त्याने पहिला हल्ला पायलट स्मित मच्छार याच्यावर केला. मात्र, गंभीर जखमी होऊनही त्याने हार मानली नाही. शेवटपर्यंत हा पट्टा भिडत राहिला. शेवटी त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि आवाज केला. ज्यानंतर प्रवाशी त्याच्या मदतीला धावले. को पायलटला प्रवाश्यांनी धरून ठेवले आणि हे विमान पुन्हा साैदीकडे वळवण्यात आले. गंभीर जखमी असतानाही विमानाला सुरक्षित स्मित यांनी उतरवले. जगभरातून स्मित मच्छार यांच्यावर काैतुकांचा वर्षाव केला जात आहे. लोक त्यांचे काैतुक करत आहेत. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी खरा हिरो स्मित मच्छार असल्याचे म्हटले आहे.

जगभरात स्मित मच्छार यांचे काैतुक होत असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मित यांच्यासाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्या धैर्याचे काैतुक नरेंद्र मोदी यांनी केले. स्मित मच्छार यांचे कुटुंबिय मुंबईत स्थायिक आहेत.

Loading...

पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवर याबद्दल एक पोस्ट शेअर करत लिहिले की, कॅप्टन स्मित मच्छार हे एक हिरो आहेत. अत्यंत गंभीर धोक्याचा सामना करताना आणि स्वतः गंभीर जखमी असूनही त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्य आणि अटळ निश्चय दाखवला. त्यांच्या या शौर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आहेत. एक मोठी दुर्घटना टळली.

भारताला कॅप्टन मच्छर यांचा अभिमान आहे.  ते लवकर बरे व्हावेत, त्यांना नव्याने बळ मिळावे आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मी प्रार्थना करत आहे. फक्त नरेंद्र मोदी हेच नाही तर जगातील अनेक देशांच्या पंतप्रधानांनी स्मित मच्छार यांचे काैतुक केले आहे. स्मित यांच्यावर सध्या दुबईत उपचार सुरू असल्याची माहिती मिळतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us