AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 पेक्षा जास्त रक्कमेच्या व्यवहारावर RBI कडून मोठी माहिती, थेट सांगितले गणितच..

सरकारकडून UPI व्यवहारावर भर देण्यात आला. UPI व्यवहार इतका जास्त वाढला की, 5 रूपयांची वस्तू खरेदी केल्यानंतरही लोक UPI च्या माध्यमातून पैसे देतात. मात्र, आता UPI व्यवहार फ्री राहणार नाही, याकरिता पैसे मोजावी लागणार आहेत.

2000 पेक्षा जास्त रक्कमेच्या व्यवहारावर RBI कडून मोठी माहिती, थेट सांगितले गणितच..
UPI RBI
| Updated on: Sep 16, 2026 | 10:06 AM
Share

रोख रक्कमेचे व्यवहार कमी व्हावेत, याकरिता सरकारकडून UPI व्यवहारावर भर देण्यात आला. UPI व्यवहार इतका जास्त वाढला की, 5 रूपयांची वस्तू खरेदी केल्यानंतरही लोक UPI च्या माध्यमातून पैसे देतात. मात्र, सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका दिला. NPCI ने मंगळवारी एक अधिसूचना जारी करून जाहीर केले की, 15 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर MDR शुल्क आकारले जाईल. ज्याने मोठा झटका बसला. सरकारने स्पष्ट केले की, हे शुल्क ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागेल. पण विषय पुन्हा तोच येतो की, दुकानदार सरकारच्या या निर्णयानंतर ग्राहकांना पैशांने व्यवहार करण्यासाठी आग्रह करतील किंवा ग्राहकांकडून पैसे मागतील. ज्यामुळे ग्राहकही अधिकचे पैसे टाळण्यासाठी पैशांता व्यवहार करण्यावर लोक अधिक भर देतील.

आरबीआयनेही (RBI) सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून, हे शुल्क लागू करणे का आवश्यक होते, हे स्पष्ट करणारी एक पोस्ट रिझर्व्ह बँकेने शेअर केली आहे. ज्यामुळे यातून आता कोणत्याही प्रकारची पळवाट नसल्याचे स्पष्ट आहे. आरबीआयने आपल्या अधिकृत एक्सवर पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी म्हटले की, डिजिटल पेमेंट प्रणालीच्या दीर्घकालीन मजबुतीसाठी हा महत्वाचा निर्णय आहे.

एमडीआरमधून मिळणाऱ्या महसूलच्या योग्य वाटपामुळे यूपीआय पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि पेमेंट प्रणाली नेटवर्कमध्ये गुंतवणूक करणे शक्य आहे. ही प्रणाली देशभरातील अधिक ठिकाणी यूपीआयचा विस्तार करण्यास नवीन ग्राहक आणि व्यापाऱ्यांना जोडण्यास आणि व्यवहारांचे प्रणाम वाढवण्यास मदत करू शकते. मात्र, या निर्णयामुळे पुन्हा रोख रक्कमेचा व्यवहार वाढण्याची शक्यता आहे.

एमडीआरमधून मिळणारे उत्पन्न यूपीआय परिसंस्थेतील विविध भागधारकांमध्ये योग्यरित्या वितरित केले जाईल. तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणासाठी गुंतवणूक करणे शक्य होईल. मात्र, व्यापाऱ्यांकडून सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. हेच नाही तर अनेक शहरात व्यापारी निषेध करतानाही दिसत आहेत. मात्र, लोक आता यूपीआय वापर कमी करणार हे यावरून स्पष्टच आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?