अमेरिकेनं चीनसमोर नांगी टाकली, भारताला मदतीसाठी साकडं, नव्या प्लॅनमुळे जगभरात मोठी खळबळ
सध्या जगभरात मोठा संघर्ष पहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीनचे संबंध देखील गेल्या काही दिवसांपासून चांगलेच ताणले गेल्याच पहायला मिळत आहे. मात्र आता अमेरिकेनं चीनची ताकद आमच्यापेक्षा जास्त असल्याचं थेट कबूलच केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात एक वेगळाच संघर्ष पहायला मिळत आहे. एकीकडे अमेरिकेचं इराणसोबत युद्ध सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामध्ये केवळ इराणचचं नुकसान झालं नाही तर अमेरिकेचे मध्य पूर्वेतील जे मित्र राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांवर इराणकडून हल्ले सुरू असल्यानं त्यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं होतं. यामुळे देखील सध्या जगातील अनेक देशांसोबतचे अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला होता, त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध आधीच बिघडले आहेत. त्यातच आता अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी मोठं विधान केलं आहे. चीनच्या वाढत्या ताकदीचा सामना करायचा असेल तर एका मोठ्या आघाडीची गरज आहे, अमेरिका एकटी चीनचा सामना करू शकत नाही, चीन हा एक मोठा देश आहे आणि चीनचं मार्केट देखील मोठं आहे. जर अमेरिकेने भारत, युरोपियन राष्ट्र, जपान आणि दक्षिण कोरियासोबत मिळून जर चीनचा सामना केला तर ती वेगळी गोष्ट आहे. भारत आणि अमेरिका हे दोन देश एकत्र आले तर जगातील 50 ते 60 टक्के अर्थव्यवस्था होते, त्यामुळे भारत आणि अमेरिका एकत्र आले तर चीनला थांबवलं जाऊ शकतं, असं ब्लिंकन यांनी म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, चीनसोबत आमचे संबंध हे खूप गुंतागुतीचे आहेत. एकीकडे आमच्या संबंधामध्ये संघर्ष आहे तर दुसरीकडे सहकार्य देखील आहे. आम्हाला सध्या चीनसोबत कोणताही संघर्ष नकोय कारण चीनची बाजारपेठ ही आमच्यापेक्षा प्रचंड मोठी आहे. चीनची उत्पादन क्षमता आमच्यापेक्षा तीन पटीने मोठी आहे. त्यांच्याकडे आमच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक जहाज आहेत, त्यांच्याकडे अनेक नवनवे शोध लागत आहेत, त्यामुळे आम्ही कितीही शक्तीशाही असलो तरी आम्ही त्यांच्यासोबत या क्षणला पंगा घेऊ शकत नाहीत, असं ब्लिंकन यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.