Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे नुकसानीपेक्षा भविष्यात भाजपचा डबल फायदा, हे राजकीय गणित समजून घ्या

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे भाजप आज बॅकफूटवर आहे. आज भाजपचं नुकसान झाल्याचं दिसतय. पण भविष्यात यात भाजपचा मोठा फायदा सुद्धा होऊ शकतो. हे राजकीय गणित फार कमी एक्सपर्ट्सनी लक्षात घेतलं असेल.

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे नुकसानीपेक्षा भविष्यात भाजपचा डबल फायदा, हे राजकीय गणित समजून घ्या
Dharmendra Pradhan
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 29, 2026 | 3:20 PM

पेपर लीक प्रकरणात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता हे आंदोलन संपल्यानंतर राजकारण जोरात सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देऊन संसद भवनात आलेल्या धर्मेंद्र प्रधान यांचं भाजपं नेत्यांनी जोरदार स्वागत केलं. हे फक्त औपचारिक स्वागत नव्हतं, तर त्यातून भाजपने राजकीय संदेश दिला. धर्मेंद्र प्रधान हे कुर्मी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. ओबीसींच्या प्रभावी जातींमध्ये कुर्मींची गणना होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला भाजप सामाजिक अँगलने मांडण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशातील कुर्मी समाज ओबीसी वोट बँकमध्ये निर्णायक भूमिका बजावतो. अशावेळी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भाजपंसाठी छुपा वरदान ठरण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात 7 ते 8 टक्के कुर्मी वोटर्स आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांची महत्वाची भूमिका आहे. कुर्मी समाजाने 2024 लोकसभा निवडणुकांच्यावेळी समाजवादी पार्टीला साथ दिली होती. पूर्वांचल ते बुंदेलखंड आणि अवध पासून रुहेलखंडापर्यंत कुर्मी समाज सपा सोबत उभा राहिला. त्यामुळे समाजवादी पार्टी खालून वर गेली. 2019 लोकसभा निवडणुकीत 5 जागा जिंकणाऱ्या समाजवादी पार्टीने 2024 च्या निवडणुकी थेट 37 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशातील सपाच्या या कामगिरीमुळे भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवता आलं नव्हतं.

भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून काम केलय

धर्मेंद्र प्रधान भले ओदिशाचे असतील, पण 2014 लोकसभा निवडणुकीपासून 2022 विधानसभा निवडणुकीपर्यंत हा कुर्मी समाज भाजपसोबत राहिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा उत्तर प्रदेश भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून काम केलं आहे. भाजप कुर्मींना आपल्या बाजूला वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने उलट भाजपचं आव्हान सोपं बनलं आहे. भाजपने यावेळी कुर्मी समाजातूनच प्रदेशध्यक्ष निवडला.त्यावरुन भाजपला कुर्मी मतं किती महत्वाची आहेत, ते लक्षात येतं.

त्यांचा राजीनामा भाजपसाठी जमेची बाजू सुद्धा ठरु शकतो

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा कुर्मी समाजाच्या संवेदनांशी जोडला गेला, तर सपाचं आव्हान कठीण होऊ शकतं. धर्मेंद्र प्रधान हे उत्तम संघटक सुद्धा आहेत. त्यांना पक्ष संघटनेत अनेक जबाबदाऱ्या संभाळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा भाजपसाठी जमेची बाजू सुद्धा ठरु शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us