AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके याने पार लावली कंगना राणावतची वाट, थेट म्हटले, तिला कोण..

अभिजीत दिपके याने पुन्हा एकदा सरकारला मोठा इशारा दिला. अभिजीत दिपके याने दिलेल्या इशाऱ्याने खळबळ उडाली. फक्त हेच नाही तर कंगणा राणावत हिने केलेल्या टीकेला उत्तर देताना अभिजीत दिपके दिसला.

अभिजीत दिपके याने पार लावली कंगना राणावतची वाट, थेट म्हटले, तिला कोण..
Abhijeet Dipke and Kangana Ranaut
| Updated on: Jul 30, 2026 | 8:40 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके याने सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. बीजेपी खासदार कंगना राणावत हिने जेंनझीबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरही अभिजीत दिपकेने प्रतिक्रिया दिली. कंगना राणावत हिला सडेतोड उत्तर अभिजीत दिपकेकडून देण्यात आले. अभिजीत दिपके याने म्हटले की, कंगना राणावत हिला कोणी गांर्भीयाने घेत नाही. तिला कोण घेते गांर्भीयाने? हेच नाही तर यावेळी 24 तासात पुन्हा एकदा अभिजीत दिपकेने आंदोलनाचा मोठा इशारा सरकारला दिला. जर सरकार सहमत झाले नाही तर आम्हाला लवकरच नवीन आंदोलन सुरू करावे लागेल. आमचे आंदोलन सरकारच्या निर्णयावर आधारित आहे. सरकारने जर सुधारणा केली नाही तर नवीन आंदोलन सुरू होईल.

कारण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसणार आहे, त्यामुळे आम्हाला हे करावेच लागेल. अभिजीत दिपके सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने समाधानी नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कंगना राणावत हिने थेट जनरेशन गटार म्हटले, ज्याने नव्या वादाला तोंड फुटले.

त्यात एक आंदोलन संपले आणि आता दुसरे आंदोलन करण्याची धमकी अभिजीत दिपकेकडून दिली जात आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला.

त्यातच विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या एफआयआरच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून भारतात दाखल झालेल्या अभिजीत दिपके याच्या नव्या पार्टीने थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. देशभरातील विविध शहरांमध्ये अभिजीत दिपके याच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. विद्यार्थी रस्त्यावर येत होती. यासोबतच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढत होती, सरकारवर दबाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला.

Follow Us
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात