AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके याने कुटुंबियांना सुनावले, मला वारंवार फोन करायचा नाही, मी तुमच्या एकट्यांचा..

कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. जंतर मंतरवरील आंदोलनाने थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. अभिजीत दिपके याचे मोठे काैतुक होत आहे. यादरम्यानच आता अभिजीत दिपके याच्या कुटुंबियांनी मोठा खुलासा केला.

अभिजीत दिपके याने कुटुंबियांना सुनावले, मला वारंवार फोन करायचा नाही, मी तुमच्या एकट्यांचा..
Abhijeet Dipke
| Updated on: Jul 27, 2026 | 8:35 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेच्या आंदोलनाला मोठे यश आले. अमेरिकेतून भारतात येऊन काही दिवस होत नाहीत, तोवरच थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात अभिजीत दिपकेला यश आले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाला बसली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आग्रह धरला. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला बळ मिळाले. कॉकरोच जनता पार्टीला देशभरातून सपोर्ट मिळाला. फक्त जंतर मंतरच नाही तर देशभरात विद्यार्थी मोर्चे काढताना दिसले. जंतर मंतरवर आंदोलकांची संख्या जबरदस्त वाढत होती. 20 जुलै 2026 रोजी अभिजीत दिपके याच्या मार्गदर्शनाखाली संसदेवर मोर्चा काढण्यात आला. तिथेच हे आंदोलन चिघळले. त्यानंतरही आंदोलक ठाम होते. अखेर मोदी सरकारला कॉकरोच जनता पार्टीपुढे झुकावे लागले.

जेंनझींची आक्रमक भूमिका बघता सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. यादरम्यानच आता अभिजीत दिपके याने त्याच्या कुटुंबियांना सतत फोन करण्याच्या मुद्द्यावर सुनावले आहे. घरच्यांचे सतत काळजीपोटी येणारे फोन यामुळे अभिजीत दिपके वैतागला आहे. अभिजीत दिपके याने म्हटले की, मी आता देशाचा मुलगा आहे, मी तुमच्या एकट्याचा मुलगा नाही.

मला सतत फोन करणे बंद करा. मला पूर्ण देश त्यांचा मुलगा मानतो. तुम्ही बघितले असेल की, ते लोक मला खायला देतात, पाणी पाजतात. सर्व लोक माझ्या आई वडिलांसारखेच आहेत. सर्वजण माझे बहीण भाऊ आहेत. अभिजीत दिपके याचे वडील म्हणाले की, अभिजीत याने असे काही करावे, ही आमची इच्छा नव्हती. पण मी त्याच्या सर्व निर्णयात त्याच्यासोबत असणार आहे.

हेच नाही तर अभिजीत दिपके याच्या वडिलांनी म्हटले की, अचानक कोणता फोन आला तरीही तो फोन उचलायला भीती वाटते, काही चुकीचे तर घडले नाही ना असा प्रश्न मनात येतो. अभिजीत दिपके याच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. मोदी सरकारमधील हा पहिलाच राजीनामा ठरला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थ्यांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार