AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके याच्याकडून मोठी चूक, आंदोलकांचा प्रचंड संताप, सोनम वांगचुक यांचा..

केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांनी दिला. त्यानंतर जंतर मंतरवर मोठा जल्लोष बघायला मिळाला. मात्र, यावेळी अभिजीत दिपके यांच्याकडून मोठी चूक झाली. अभिजीत दिपके याला खडेबोल सुनावले जात आहेत.

अभिजीत दिपके याच्याकडून मोठी चूक, आंदोलकांचा प्रचंड संताप, सोनम वांगचुक यांचा..
Abhijit Dipke and Sonam Wangchuk
| Updated on: Jul 27, 2026 | 6:50 AM
Share

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन जंतर मंतर दिल्ली येथे सुरू होते. या आंदोलनाची व्याप्ती वाढत होती. शिष्टमंडळाच्या पहिल्या बैठकीत सरकारने 3 पैकी दोन मागण्या अगोदरच मान्य केल्या. त्यानंतर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांना वेळ मागितला. काल दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा राजीनामा झाला. या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. हजारोच्या घरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर सरकारला झुकावे लागले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान हा मोदी सरकारमधील आतापर्यंतचा पहिला राजीनामा ठरला. एक महिन्यापासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती आणि तसे आंदोलन सुरू होते. ज्यावेळी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यावेळी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके जंतर मंतरवरच होते.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचे कळाताच एक मोठा जल्लोष बघायला मिळाला. यावेळी अभिजीत दिपके भाषण देताना दिसला. मात्र, यावेळी अभिजीत दिपके सोनम वांगचुकचे नाव घेण्यास विसरला. 26 दिवस धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सोनम वांगचुक यांनी उपोषण केले. मात्र, त्याच सोनम वांगचुकचा विसर अभिजीत दिपकेला पडला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके जेंनझीचे स्वागत करताना दिसला. भीती विसरून देशासाठी विद्यार्थी पुढे आल्याने मी त्यांचे धन्यवाद मानतो, असे अभिजीत दिपकेने म्हटले. धर्मंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर मोठा जल्लोष झाला. यावेळी अभिजीत दिपकेने बराचवेळ भाषण केले. मात्र, एकवेळही सोनम वांगचुक यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, काही वेळानंतर अभिजीत दिपके सोनम वांगचुक यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसला.

भाषणावेळी बोलताना अभिजीत दिपके याने म्हटले की, देश बर्बाद झाला. कारण आपण कोणालाही हिरो बनवतो. यावेळी त्याने कुठेही सोनम वांगचुक यांचे नाव घेतले नाही. अभिजीत दिपके याने सोनम वांगचुक यांचे नाव न घेतल्याने सर्वांनाच राग आला. ज्या माणसाने याच मुद्द्यात तब्बल 26 दिवस उपोषण केले आणि आज विजय झाल्यानंतर त्यांना विसरले जाते हे खूप जास्त दुखद असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर