साप कितीही विषारी असूद्या, ही वनस्पती म्हणजे सर्पदंशाचा कर्दनकाळच, झटक्यात उतरवते विष

भारतामध्ये अशा काही वनस्पती आहेत, ज्याचा उपोयग सर्पदंशावर केला जातो. अशाच एका वनस्पतीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

साप कितीही विषारी असूद्या, ही वनस्पती म्हणजे सर्पदंशाचा कर्दनकाळच, झटक्यात उतरवते विष
| Updated on: Aug 23, 2025 | 3:42 PM

भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच विषारी आहेत. भारतामध्ये ज्या सापाच्या जाती आढळतात, त्यामध्ये नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे या चार जाती सर्वात विषारी आहेत, ज्याला आपण बिग फोर असं देखील म्हणतो. एखाद्या व्यक्तीला जर साप चावला तर त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळून देणे, डॉक्टरांकडे घेऊन जाणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे या रुग्णाचे प्राण वाचू शकतात.

दरम्यान मध्य प्रदेशातील पन्नाच्या जंगालामध्ये अशी एक वनस्पती आहे, ज्याचा उपयोग येथील स्थानिक लोक साप चावल्यानंतर करतात, या वनस्पतीमुळे सापाचं विष कमी होत असल्याचा दावा येथील स्थानिक वैद्यांकडून करण्यात येतो. कलिहारी असं या वनस्पतीचं नाव आहे. या वनस्पतीचा उल्लेख हा रामायण काळात देखील आढळतो. या वनस्पतीमध्ये मुळांपासून ते पानांपर्यंत औषधी गुणधर्म असल्यामुळे या भागात या वनस्पतीचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.

स्थानिक वैद्यांनी केलेल्या दाव्यानुसार ही वनस्पती विषविरोधी असल्यामुळे साप चावल्यानंतर देखील या वनस्पतीचा उपयोग केला जातो. या वनस्पतीमध्ये प्रचंड प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत, मात्र त्यासोबतच ही वनस्पती विषारी देखील आहे, त्यामुळे केवळ जाणकराच्या मार्गदर्शनाखालीच या वनस्पतीचा वापर केला जाऊ शकतो. या वनस्पतीपासून बनवलेलं औषध हे कुष्ठरोगासाठी देखील दिलं जातं.

दरम्यान ही वनस्पती औषधी आहे, या वनस्पतीच्या मुळापासून ते पानापर्यंत सर्व घटकांचा उपोयग हा औषधीसाठी होत असल्यानं अनेक जण ही वनस्पती मुळासकट उपटून नेतात, त्यामुळे आता या वनस्पतीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, स्थानिक पातळीवर या वनस्पतीचं सवर्धन करण्याचं काम सुरू आहे.

औषधी गुणधर्म 

ही वनस्पती फक्त मध्य प्रदेशातील पन्नाच्या जंगलांमध्येच सापडते, रामायण काळात देखील या वनस्पतीचा औषध म्हणून उपोयग केल्याचा संदर्भ सापडतो.  आजही स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात या वनस्पतीचा वापर करतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही, एखाद्या व्यक्तीला साप चावल्यास त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे.)