हायवेर तो बाईकचा एक्सलेटर घुमवत होता, पाठी नोटांचा पाऊस होत होता, अखेर त्या तरुणाने…
मागून येणाऱ्या अमित भाईंनी या बेफाम वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराला हाक मारली, पण बाईक काही थांबली नाही. मग त्याने या सर्व नोटा गोळा करायला सुरुवात केली... जेव्हा त्यांनी त्या मोजल्या, तेव्हा ही रक्कम एकूण ४ लाख रुपये झाली...

‘बाप बड़ा ना भैया सबसे बड़ा रुपैया’, अशी एक हिंदीत म्हण प्रसिद्ध आहे. सर्व जग पैशांच्या पुढे झुकत असताना आणि ज्याच्याकडे पैसा तो मोठा ! असे गणित असताना मेरठ हायवेवर एक चमत्कारिक घटना घडली आहे. मेरठ हायवेवर एका वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराच्या बॅगेची झिप उघडी राहिल्याने, त्याच्या बॅगेतून नोटांची अक्षरश: संपूर्ण महामार्गावर बरसात झाली. ही घटना घडली त्यावेळी या मार्गावरुन जाणाऱ्या एका तरुणाने ही बाब त्या बाईकस्वाराच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतू…घडले भलतेच…
या बेफाम वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराला मागून येणाऱ्या एका तरुणाने हाक मारुन ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने लक्ष न दिल्याने या नोटांचे करायचे काय ? असा प्रश्न या तरुणाला पडला, अखेर त्याने पोलिसांना बोलावून घेतले आणि घडलेला घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी देखील या तरुणांची इमानदारी पाहून त्यांचे कौतूक केले…
त्याचे झाले काय मेरठ करनाल हायवे वरुन एक बाईकस्वार वेगाने जात होता. त्याच्या बॅगेची झिप उघडी राहिल्याने त्याच्या बॅगेतील ५०० आणि २०० च्या नोटांची बड्डल्स रस्त्यावर हवेत उडून पडली. सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यावर या नोटांची बड्डले विखुरली होती. या वेळी या बाईकस्वाराच्या मागून जाणाऱ्या अमित कुमार नावाच्या तरुणाने ही बाब त्या वेगाने जाणाऱ्या तरुणाला हाक मारुन सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू हा तरुण न ऐकताच तसाच वेगाने पुढे गेला…
त्यामुळे या सर्व नोटा अमित कुमार आणि त्याच्या मित्राने जमा करायला सुरुवात केली. तेव्हा ही रक्कम चक्क चार लाख रुपये निघाली. या नोटा त्याच्या खऱ्या मालकापर्यंत पोहचाव्यात यासाठी या तरुणाने क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना कॉल केला. त्यानंतर पोलिस घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस देखील ४० मिनिटे या नोटांना गोळा करत राहिले. एकूण पाचशे आणि दोनशे रुपायाच्या एकूण ११ गड्ड्या सापडल्या. आजच्या कलियुगाच्या काळात पैशासाठी नात्यांच्या उरावर उठणाऱ्या काळात या चार लाख रुपयांना पाहूनही अमित याला त्यांची लालसा वाटली नाही. त्यांनी पोलिसांना पाचारण करुन सर्व नोटा त्यांच्या सुपूर्द केल्या. पोलिसांनी देखील या तरुणाचे कौतूक करीत त्याला शाबासकी दिली आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
मेरठ हाईवे पर हुई “पैसों की बारिश🌧️💸
एक बाइक सवार तेज रफ्तार में जा रहा था। बैग की चेन खुली रह गई और पीछे से 500 और 200 के नोट हवा में उड़ने लगे।
करीब आधा किलोमीटर तक सड़क पर नोट ही नोट बिखरे पड़े थे।
पीछे से आ रहे अमित भाई ने आवाज लगाई, लेकिन बाइक रुकी नहीं। उन्होंने बिना… pic.twitter.com/UCoDW0uL96
— Sachin Verma🐦 (@itSachinverma) August 15, 2026