AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठून कुठेही प्रवास करा… सरकारी बसेस एक महिना फ्रि, युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; देशात पेट्रोलची मारामार होताच…

इराण युद्धामुळे मध्य पूर्वेतील होर्मुझ सामुद्रधुनीतील तेलाच्या जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाल्याने जागतिक बाजारात इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अनेक देशात ऊर्जा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

कुठून कुठेही प्रवास करा... सरकारी बसेस एक महिना फ्रि, युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; देशात पेट्रोलची मारामार होताच...
file photo
| Updated on: Apr 03, 2026 | 8:35 PM
Share

इराण युद्धामुळे एकीकडे जगभरात इंधनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे.अनेक देशांनी ऊर्जा लॉकडाऊन सुरु केले आहे. भारताचा शेजारी पाकिस्तान आणि बांगलादेश सारखे देश देखील या संकटापासून  वाचले नाहीत. कारण जागतिक बाजारात क्रुड ऑईलचे दर गगनाला भिडल्याने  पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील वाढले आहेत. व्हिएतनाम सारख्या देशाने विमानाचे इंधन दर वाढल्याने विमान वाहतूकच बंद केली आहे.

आपला शेजारील देश पाकिस्तानने देखील जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने तेथील इंधनाचे दर वाढवले होते. ही घोषणा रात्री उशीरा केल्यानंतर पेट्रोलच्या किंमती ४२.७ टक्के आणि डिझेलच्या किंमतीत ५४.९ टक्के वाढ केली होती. या दरवाढीनंतर रस्त्यांवर निदर्शने झाली होती.

पेट्रोल- डीझल पंपावर मोटरसायकलींच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी एक्सवर लिहीले की इस्लामाबादचे सर्व सार्वजनिक परिवहन सेवा पुढील ३० दिवसांसाठी सर्वसामान्यांना मोफत असतील. याची सुरुवात शनिवार पासून केली जाईल. त्यांनी पुढे लिहिले की यामुळे सरकारवर ३५० मिलियन रुपयांचा( सुमारे १.२५ मिलियन डॉलर )बोझा पडणार आहे. पाकिस्तानची सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य पंजाबचे मुख्यमंत्र्याने देखील सार्वजनिक परिवहनावरील भाडे रद्द केले आहे. आणि ट्रक आणि बसेससाठी टार्गेटेड सबसिडीची घोषणा केली आहे.

मरियम नवाझ शरीफ यांनी ऑपरेटर्सना अपिल केले आहे की त्यांनी वाढलेल्या खर्चाचा भार प्रवाशांवर टाकू नये. आणि पुढे म्हटले आहे की आम्ही वादा करतो की परिस्थिती सुधारताच जनतेला आर्थिक बोझ्यापासून दिलासा देऊ. सिंध येथील पाकिस्तानचे सर्वात मोठे शहर कराची येथील प्रांतीय सरकारने मोटरसायकल चालवणाऱ्यांसाठी आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी याच प्रकारच्या सबसिडीची घोषणा केली आहे. २८ फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या इराण युद्धाने मध्य पूर्वेतील परिस्थिती बिकट केली आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांवर हल्ले सुरु केल्याने आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांना जवळपास रोखल्याने इंधनाचे संकट तयार झाले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे प्रति लिटर दर काय?

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक इंधन दरांमध्ये झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर,पाकिस्तानने पेट्रोल आणि ‘हाय-स्पीड डिझेल’ (HSD) च्या किमतींमध्ये पाकिस्तान सरकारने अनुक्रमे ४३ टक्के आणि ५५ टक्क्यांची प्रचंड दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर ३२१.१७ रुपयांवरून वाढवून ४५८.४१ रुपये प्रति लिटर झाला आहे. ही १३७.२३ रुपयांची (सुमारे ४२.७ टक्के) वाढ आहे. दरम्यान, HSD चा दर ३३५.८६ रुपयांवरून वाढवून ५२०.३५ रुपये प्रति लिटर करण्यात आला. ही १८४.४९ रुपयांची (सुमारे ५५ टक्के) वाढ आहे. हे नवीन दर तात्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. याव्यतिरिक्त, रॉकेलच्या (Kerosene) दरातही ३४.०८ रुपये प्रति लिटरने वाढ करण्यात आली असून, त्याचा नवीन दर ४५७.८० रुपये झाला आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?