AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 June : 1 जूनपासून होणार हे बदल, तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम

दर महिन्याला काहीना काही बदल होत असतात. तसेच काहीसे महत्त्वाचे बदल एक जूनपासून होणार आहेत. ड्राईविंग लायन्सपासून ते आधार कार्ड पर्यंत, एलपीजी पासून ते पट्रोल डिझेल पर्यंत अनेक बदल होणार आहेत. याशिवाय बँका देखील बरेच दिवस सुट्टयांमुळे बंद राहणार आहेत.

1 June : 1 जूनपासून होणार हे बदल, तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
| Updated on: May 28, 2024 | 8:21 PM
Share

मे महिना संपत आला आहे. १ जूनपासून तुमच्या घरगुती खर्चाशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. दर महिन्याच्या एक तारखेपासून अनेक नियमात बदल होतात. जून महिन्यात एलपीजी सिलिंडर, बँक सुट्ट्या, आधार अपडेट आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. यामुळे तुमचे आर्थिक बजेटही बिघडू शकते.

पेट्रोल- डिझेल, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल

एलपीजीची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवली जाते. १ जून रोजी कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती ठरवणार आहेत. मे महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. आता जूनमध्येही कंपन्या पुन्हा एकदा सिलिंडरच्या किमती कमी करू शकतील अशी अपेक्षा आहे. 1 जून रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होणार आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ला जाण्याची गरज नाही

1 जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओमध्येच परीक्षा द्यावी लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे सोपे होणार आहे. कारण तुम्ही सरकार मान्य ड्राईव्हिंग सेंटरमध्ये देखील टेस्ट देऊ शकणार आहात.

वाहतुकीचे नियम कडक होणार

नव्या नियमांनुसार आता वाहतुकीचे नियमही कडक होणार आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या शिवाय परवाना देखील रद्द होऊ शकतो आणि 25 वर्षे नवीन परवाना मिळू शकणार नाही. याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे. ज्यामध्ये वेगात गाडी चालवल्यास 1000 ते 2000 रुपये, विना परवाना वाहन चालवल्यास 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड आकारला जाईल.

14 जूनपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI नुसार, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhar card update online) 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल, तर तुम्ही 14 जूनपर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. UIDAI पोर्टलवर आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली जात आहे. मात्र, 14 जूननंतर तुम्हाला या कामासाठी पैसे द्यावे लागतील. तुम्ही हे काम आधार केंद्राला भेट देऊन देखील करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेल्यास तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर UIDAI पोर्टलवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

जूनमध्ये एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या

जून महिन्यात बकरी ईद, वट सावित्री पोर्णिमा यासह विविध सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या (लोकसभा) सातव्या टप्प्यात एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. देशात 1 जून रोजी बँकांना सुट्टी असेल. बँका बंद राहतील, या काळात तुम्ही बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आधीच करुन घ्यावीत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.