ISRO News : गगनयान अंतराळात झेपावणार, इस्त्रोने तारीखच सांगितले, काय अपडेट

Mission Gaganyaan ISRO : इस्त्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी गगनयान मिशनबाबत मोठी अपडेट दिली आहे. गगनयान ही भारताची महत्त्वाची अंतराळ मोहिम असून त्याची तारीखच त्यांनी सांगितली. त्यामुळे अंतराळात भारत इतिहास रचनार आहेत.

ISRO News : गगनयान अंतराळात झेपावणार, इस्त्रोने तारीखच सांगितले, काय अपडेट
इस्त्रो, गगनयान
| Updated on: Aug 22, 2025 | 12:01 PM

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने( ISRO) देशवासियांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. मिशन गगनयानबाबत एक मोठी अपडेट त्यांनी दिली. इस्त्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी गुरुवारी याविषयीची माहिती दिली. यावर्षी डिसेंबरमध्ये पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी गगनयान-जी1 प्रक्षेपत केले जाईल. नारायणन यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि प्रशांत बालकृष्णन नायर यांच्यासह त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही महत्त्वाची बातमी दिली आहे.

नारायणन म्हणाले की, गेल्या चार महिन्यात या क्षेत्रात अनेक नवीन कामगिरी बजावण्यात आली आहे. त्यात अनेक प्रयोग यशस्वी ठरली आहे. त्यातच पहिले मानवविरहीत मिशन जी1 या वर्षाच्या अखेरीस, डिसेंबरच्या जवळपास प्रक्षेपित करण्यात आले. त्यात अर्धमानव सारखी दिसणारी व्योमामित्रा सुद्धा अंतराळात जाणार आहे.

ISS मिशनचा अनुभव उपयोगी

यशस्वी अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेवर शुक्ला होते. ते परत आले आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (ISS) अनुभव भारताच्या स्वतःच्या गगनयान मोहिमेसाठी आणि भारतीय अंतराळ स्थानकासाठी उपोयगी ठरणार असल्याचे शुक्ला म्हणाला. आम्ही लवकरच आपल्या कॅप्सूलमधून, आपल्या रॉकेटचा वापर करत पृथ्वीवरून कोणाला तरी अंतराळात पाठव. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्यांचे,सरकारचे, इस्त्रोचे शुक्ला यांनी आभार मानले. गगनयान मोहीम ही संपूर्ण देशासाठी एखाद्या मोहिमेपेक्षा कमी नाही असे शुक्ला म्हणाले.

काय आहे गगनयान?

गगनयान मोहिम ही इस्त्रोची महत्त्वकांक्षी अंतराळ मोहिम आहे. भारत या मोहिमेत पहिल्यांदाच अंतराळात मानव पाठवणार आहे. पृथ्वीच्या समतल कक्षेत मानवाला पाठवणे हे या मोहिमेचा उद्देश आहे. सुरक्षित अंतराळ मोहिमा सुरक्षितपणे राबवणे, अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणणे आणि अंतराळात भारताचे सक्षम नेतृत्व समोर आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.

व्योममित्र यंदाच अंतराळात

गगनयान मोहिमेत पहिले मानवरहित मिशन यंदाच पूर्ण होणार आहे. पहिली मानवरहित मोहिम डिसेंबर 2025 मध्ये “व्योममित्र” या अर्ध-मानव रोबोटसह प्रक्षेपित केली जाईल. त्यानंतर आणखी दोन मानवरहित मोहिमा राबवण्यात येतील. या चाचण्या मानव सदृश परिस्थितीत यंत्रणांची कार्यक्षमता तपासतील. तर 2027 मध्ये भारतीय पाऊल अंतराळात पडेल.

2027 मध्ये भारतीय पाऊल अंतराळात

गगनयान मोहिमेत भारतीय पहिल्यांदा अंतराळात पाऊल टाकेल. 2027 मधील पहिल्या तिमाहीत भारतीय अंतराळवीर, अंतराळात पाठवण्यात येईल. या मोहिमेतंर्गत तीन अंतराळवीरांना पाठवण्यात येणार आहे. ही मोहिम 3 दिवस ते आठवडा चालण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे.