AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxman Hake : म्हणून माळी समाजाच्या पोटात दुखतंय…लक्ष्मण हाकेंच्या त्या व्हायरल व्हिडिओचे सत्य काय? खळबळीनंतर काय खुलासा

Laxman Hake Statement : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. माळी समाजाबद्दल त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. त्यावरून त्यांच्यावर नाराजी व्यक्त होत आहे.

Laxman Hake : म्हणून माळी समाजाच्या पोटात दुखतंय...लक्ष्मण हाकेंच्या त्या व्हायरल व्हिडिओचे सत्य काय? खळबळीनंतर काय खुलासा
लक्ष्मण हाकेंचे वादग्रस्त वक्तव्य
| Updated on: Aug 22, 2025 | 10:56 AM
Share

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्याविषयी खुलासा पण केला आहे. काय आहे हा वाद, काय आहे ते वक्तव्य?

काय आहे ते वक्तव्य?

“काय आहे, माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांची पोटशूळ” असं वक्तव्य संबंधित व्हायरल व्हिडिओत लक्ष्मण हाके करत असल्याचे दिसते. या व्हिडिओची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. या व्हिडिओत पुढे ते काही तरी बोलत असले तरी ते वक्तव्य नीट ऐकू येत नाही. ते वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयीचे असल्याचे म्हटले जाते. या वक्तव्यावरून एकच खळबळ उडाली आहे. हाके यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.

हाके यांनी केला खुलासा

तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यावर खुलासा केला आहे. माळी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ माझा आहे. पण त्यातील आवाज आपला नसल्याचा दावा हाकेंनी केला. ओबीसी जातींमध्ये फुट पाडण्यासाठी आणि त्यांच्यात भांडणं लावण्यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप हाकेंनी केला. असं वक्तव्य करायला मी काही वेडा नाही असे ते म्हणाले. हाकेंनी जरांगे यांच्याविरोधात मोर्चा उघडला असताना हा व्हिडिओ समोर आल्याने ते अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

नवनाथ वाघमारे यांची नाराजी

या व्हिडिओवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की सोशल मीडियावर आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहिला आहे. माळी समाजाने नवनाथ वाघमारे यांच्या आधाी लक्ष्मण हाके यांचा सत्कार केला. त्यांचा सन्मान केला. त्याच हाकेंच्या तोंडून असं वक्तव्य निघत असेल तर खरंच दुर्देव आहे. आता ते बोलले किंवा नाही बोलले हे माहिती नाही. ते व्हिडिओत तरी बोललेले दिसत आहेत. त्यावर आता हाके प्रतिक्रिया देतील, असे वाघमारे म्हणाले.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा