युट्यूब, हिलियम गॅस आणि हॉटेल… चार भिंतीत असं काय घडलं? चार्टर्ड अकाऊंटेंटने… ते दृश्य पाहून पोलिसांनाही फुटला घाम

सिद्दिपेटमध्ये 33 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने जुगारामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीतून टोकाचं पाऊल उचललं. हेलियम वायू हुंगून त्याने हॉटेलमध्ये जीवन संपवले.

युट्यूब, हिलियम गॅस आणि हॉटेल... चार भिंतीत असं काय घडलं? चार्टर्ड अकाऊंटेंटने... ते दृश्य पाहून पोलिसांनाही फुटला घाम
हॉटेलच्या खोलीतलं दृश्य पाहून पोलिसांनाही फुटला घाम
| Updated on: Aug 06, 2026 | 11:41 AM

तेलंगणाच्या सिद्दिपेट जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडल्याचे उघड झालं आहे. अवघ्या 33 वर्षांच्या एका सीएने टोकाचं पाऊल उचलत त्याचं आयुष्य संपवल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीला जुगाराचं व्यसन होतं आणि त्यातून झालेल्या आर्थिक नुकसानामुळे तो खचला, त्या व्यसनानाचे अखेर त्याचा जीव घेतला. 33 वर्षांच्या या इसमाने हिलीयम वायू हुंगून स्वत:चं जीवन संपवलं. सिद्दिपेटमधील एका हॉटेलच्या खोलीत त्याचा मृतदेह सापडला. एवढंच नव्हे तर त्यातून एक सुसाईड नोटही सापडली असून, जुगारात झालेलं नुकसान हेच आपल्या मृत्यूचं कारण असल्याचं त्याने त्यामध्ये नमूद केलं होतं. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून हॉटेलच्या खोलतीीस दृश्य पाहून सगळेच हादरले होे.

जुगारामुळे नुकसान, फ्लॅटही विकला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरूण हा सिद्दिपेट जिल्ह्यातील होता आणि तो आणि हैदराबादमधील एका खाजगी कंपनीत ‘चार्टर्ड अकाउंटंट’ म्हणून काम करायचा. मात्र बऱ्याच काळापासून त्याला जुगाराचं व्यसन होतं. त्यापायी त्याचं मोठ नुकसान झालं,आर्थिक परिस्थितीदेखील खालावली होती. एवढं सगळं होऊनही त्याला त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत करण्याचाही प्रयत्न केला. मात्र परिस्थिती एवढी चिघळली होती की त्या इसामाला त्याचा हैदराबादमधील फ्लॅटही विकावा लागला. एवढं सगळं करूनही त्याला या आर्थिक संकटातून काही बाहेर पडता आले नाही.

आधीच केली होती जीव देण्याची तयारी

संपूर्ण नुकसान झाल्याने तो खचला होता, अखेर त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने आत्महत्येची पूर्ण तयारी आधीच करून ठेवली होती, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं. त्या तरूणाने, हैदराबादमधील बालानगर भागातून हेलियम गॅसचा सिलिंडर आणि त्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य विकत घेतलं होतं. त्यानंतर, त्याने हेलियम गॅसचा वापर करून आत्महत्या करण्याच्या पद्धतींविषयी इंटरनेट आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले. पोलिसांच्या माहितीनुसार, 1ऑगस्ट रोजी सिद्दिपेटमधील एका हॉटेलच्या खोलीत त्याने मास्कच्या साहाय्याने हेलियम गॅसचा श्वास घेतला आणि आपलं आयुष्य संपवलं.

हॉटेलच्या खोलीतून कित्येक दिवस बाहेरच पडला नाही

मिळालेल्या माहितीनुसार, तो तरुण हॉटेलमध्ये राहत होता, पण गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या खोलीबाहेर आला नव्हता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा दरवाजा ठोठावला, तरीही आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, 4 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं, हॉटेलच्या एका खिडकीवाटे त्यानी खोलीत प्रवेश केला. मात्र समोरचं दृश्य पाहून ते हादरले, त्या खोलीत तो तरूण मृतावस्थेत सापडला. खोलीची झडती घेत असताना पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली, ज्यातून संपूर्ण कारण समोर आलं.

जुगारात सतत नुकसान झाल्यामुळे तो तरूण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला होता, असं त्याने या नोटमध्ये लिहीलं होतं. तो प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली होता, असंही तपासातून उघड झालं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाच्या सर्व पैलूंची पडताळणी करत तपास सुरू केला आहे.

दिल्लीतही घडला होता असा प्रकार

यापूर्वी दिल्लीतही असाच प्रकार घडला होता. गेल्या वर्षी, म्हणजेत 30 जुलै 2025 रोजी दिल्लीत हेलियम वायूचा वापर करून आत्महत्येची अशीच एक घटना समोर आली होती. त्यावेळ, धीरज कन्सल या 31 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटचा मृतदेह एका गेस्ट हाऊसच्या खोलीत आढळला होता. पोलीस तपासातून असं निष्पन्न झालं होतं की, त्याने गेस्ट हाऊसची खोली आधीच आरक्षित केली होती, तसेच ऑनलाइन हेलियम वायूचा सिलिंडर मागवला होता. त्यानेही जीव देण्यापूर्वी चिठ्ठी लिहीली होती. आपला जन्म झाला हीच सर्वात दुःखद बाब असून, जे करतोय त्याबद्दल किंवा कोणाबद्दलही कोणतीही तक्रार किंवा खंत नाही, असं त्याने लिहीलं होतं. लहानपणीच्या त्याने वडील गमावले होते, आजी-आजोबांनी त्याचं पालनपोषण केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us