गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता, मतदारसंघही ठरला?

नवी दिल्ली : सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर राजकारणातील इनिंग सुरु करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर नवी दिल्लीतून उभा राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. गंभीर दिल्लीमधील नवी दिल्ली या लोकसभा मतदार संघात खासदारकीसाठी मैदानात उतरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गौतम गंभीरला भाजपकडून लोकसभेच्या …

गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता, मतदारसंघही ठरला?

नवी दिल्ली : सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर राजकारणातील इनिंग सुरु करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर नवी दिल्लीतून उभा राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. गंभीर दिल्लीमधील नवी दिल्ली या लोकसभा मतदार संघात खासदारकीसाठी मैदानात उतरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गौतम गंभीरला भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातून गौतम गंभीरला उमेदवारी दिली जाऊ शकते. या मतदारसंघात सध्या भाजपच्या मीनाक्षी लेखी खासदार आहेत. गौतम गंभीरही याच मतदारसंघात राहतो. त्यामुळे त्याला याच मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.

गौतम गंभीरने गेल्या काही दिवसांपासून केलेल्या ट्वीटमधून आपण त्याचा राजकीय मूड ओळखू शकतो. त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. अरविंद केजरीवाल दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलनाला बसणार होते. यावर गंभीर म्हणाला होता, “दिल्लीमध्ये 2 कोटीपेक्षा अधिक लोक आहेत, हजार समस्या आहेत. मात्र यावर काही उपाययोजना नाही. मुख्यमंत्र्यांचं अजून एक स्पेशल आंदोलन”.

केजरीवाल यांच्या जाहिराती वृत्तपत्रात छापून आल्यानंतरही त्याने जनतेच्या पैशाचा गैरवापर होत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

15 वर्ष देशासाठी क्रिकेट खेळणारा गौतम गंभीर 58 कसोटी सामने आणि 147 एकदिवसीय सामने खेळला आहे. वन डे सामन्यात 11 शतक करत त्याने 5238 धावा केल्या आहेत आणि कसोटी सामन्यात 9 शतकांसह 4154 धावा केल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *