तरुणीकडून दुचाकी अपघातातून वाचवण्यासाठी खास जॅकेट तयार

आता पर्यंतच्या सर्व रोड अपघातात मोठ्या प्रमाणात बाईक अपघातांचा समावेश आहे. या बाईक अपघातात अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत.

तरुणीकडून दुचाकी अपघातातून वाचवण्यासाठी खास जॅकेट तयार
Follow us
| Updated on: Jun 10, 2019 | 6:12 PM

अहमदाबाद : आता पर्यंतच्या सर्व रोड अपघातात मोठ्या प्रमाणात बाईक अपघातांचा समावेश आहे. या बाईक अपघातात अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. याच अपघातावर आळा बसण्यासाठी तसेच अपघातामधील चालकाचे प्राण वाचवण्यासाठी गुजरातमधील एका विद्यार्थीनीने खास जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटमुळे अपघात झाला तर बाईकस्वाराचे प्राण वाचू शकतात, असा दावा गुजरातमधील विद्यार्थीनीने केला आहे. प्रगती शर्मा असं या विद्यार्थीनीचं नाव आहे.

प्रगती शर्माने ‘लाईफ सेव्हिंग जॅकेट’ तयार केले आहे. तिने हे जॅकेट आपल्या राष्ट्रीय फॅशन प्राद्योगिकी संस्था, गुजरातमधून तयार केले आहे. ती सध्या या संस्थेमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिने या जॅकेटला ‘जीवन सुरक्षा बाईक वायू जॅकेट’ नाव दिले आहे. या जॅकेटचे वैशिष्ट असे की, जेव्हाही बाईकचा अपघात होईल तेव्हा या जॅकेटमधील फुग्यामध्ये हवा भरली जाईल आणि यामुळे बाईकस्वाराला कमी दुखापात होईल, असा दावा प्रगतीने केलe आहे. जॅकेट तयार केल्यानंतर प्रगतीने संस्थेमध्ये टॉप फाईव्ह विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

“माझ्या एका सहकाऱ्याचा चंदीगडमध्ये बाईक अपघात झाला होता आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, तेव्हा मी ठरवले होते की, बाईक अपघातापासून प्राण वाचवण्यासाठी मी जॅकेट तयार करणार. तीन महिन्याच्या कठोर प्रयत्नानंतर मी हे सुरक्षा बाईक वायू जॅकेट तयार केले आहे”, असं प्रगती म्हणाली.

जीवन सुरक्षा बाईक वायू जॅकेट दिसायला साधारण आहे. पण बाईक जर एखाद्या वाहनाला धडकली, तर जॅकेटच्या आतून एअर बलून एक सेकंदात बाहेर येतील. यामुळे बाईक चालकाला पडल्यावर कमी मार लागेल. प्रगती शर्माने सांगितले आहे की, जॅकेट सध्या पेटेंट करण्याची प्रक्रिया संस्था करत आहे.

प्रगतीच्या कामगिरीमुळे गुजरातच्या सुंदरनगर आणि राष्ट्रीय फॅशन प्राद्योगिकी संस्थानाचे नाव रोषण झाले आहे. ऑगस्ट महिन्यात हे जॅकेट टेक्सटाईल येथे लाँच केले जाणार आहे. प्रगती शर्मा सुंदरनगरच्या बीएसएल कॉलनीत राहते. तिचे वडील सुदेश शर्मा बीएसएल प्रोजेक्टच्या पॉवर हाऊसमध्ये कनिष्ठ अभियंता आणि आई रजनी शर्मा बीएसएल मॉडल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करते.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.