AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतामधील 1 लाख रुपये ओमानमध्ये किती होतात? तुम्ही त्यातून काय काय खरेदी करू शकता?

ओमानी रियाल हे जगातील सर्वात मजबूत चलनापैकी एक चलन आहे. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की ओमानमध्ये भारताचे एक लाख रुपये किती होत असतील? त्यातून तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?

GK : भारतामधील 1 लाख रुपये ओमानमध्ये किती होतात? तुम्ही त्यातून काय काय खरेदी करू शकता?
CurrencyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 29, 2026 | 9:54 PM
Share

युद्धामुळे सध्या मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाची झळ मोठ्या प्रमाणात आखाती देशांना देखील बसली आहे. या हल्ल्यांमधून ओमान देखील सुटू शकलेला नाहीये, ओमानच्या सलालाह बंदराजवळ ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये एक परदेशी नागरिक जखमी झाला आहे. तसेच बंदराचं देखील काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात जर तुम्ही भारतामधून एक लाख रुपये घेऊन ओमानला गेले तर ओमानमध्ये त्याचं मूल्य किती असेल? एक लाख भारतीय रुपयांच्या मोबदल्यात तुम्हाला ओमानमध्ये किती ओमानी रियाल मिळतील?

भारताच्या एक लाख रुपयांची किंमत

एक्सचेंड रेटनुसार भारताच्या एक लाख रुपयाची किंमत ओमानमध्ये जवळपास 406 ओमानी रियाल एवढी होते. हा आकडा तुम्हाला ऐकण्यासाठी छोटा वाटत असेल कारण ओमानी रियाल हे जगातील सर्वात मजबूत चलनापैकी एक चलन आहे. त्यामुळेच ओमानी रियालचं मूल्य एवढं प्रचंड आहे.

तुम्ही एक लाखात काय -काय खरेदी करू शकता

जर तुम्ही ओमानला भारताचे एक लाख रुपये घेऊन गेलात तर तुम्ही तेवढ्या पैशांमध्ये मस्कट सारख्या मोठ्या शहराच्या उपनगरांमध्ये एक महिन्यासाठी वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेऊन आरामात राहू शकता. तुम्हाला ओमानमध्ये जर एक वन बिएचके फ्लॅट भाड्यानं घ्यायचा असेल तर त्यासाठी भाडं म्हणून 150 ते 250 ओमानी रियाल एवढा रेंट द्यावा लागतो. तुम्हाला त्या फ्लॅटमध्ये काय-काय सुविधा मिळणार आहेत? त्यावर देखील त्या फ्लॅटचं भाडं अवलंबून असतं.

जेवण आणि किराणा सामान

एक एकटा व्यक्ती 70 ते 100 ओमानी रियालमध्ये आपला महिनाभराचा खर्च आरामात भागू शकतो. यामध्ये तुमच्या जेवणाचा खर्च आणि इतर सर्व खर्चांचा समावेश आहे. इथे महागाई कमी असल्यामुळे तेवढ्या ओमानी रियालमध्ये तुमचा खर्च आरामात भागू शकतो.

इंधनचा खर्च

ओमानमध्ये जर तुमच्याकडे वाहन असेल तर इंधनाचा खर्च दर महिन्याला प्रति व्यक्ती 25 – 40 ओमानी रियाल एवढं येतो. थोडक्यात तुमच्याकडे जर भारतामधील एक लाख रुपये असतील तर तुम्ही ओमानमध्ये एक महिना आरामात राहू शकता.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात