
Glacier Burst: वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. उत्तराखंडमध्ये सखल भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे शुक्रवारी दुपारी मोठी नासधूस झाली. प्रचंड हिमवृष्टीनंतर ग्लेशियर तुटले. त्यामुळे 57 मजूर बर्फाखाली गाडले गेले. मात्र, रेस्क्यू करुन 16 मजुरांना वाचवण्यात यश आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळ 57 मजूर हिमनदीखाली गाडले गेले. मात्र, 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित 41 मजुरांचा शोध सुरू आहे. लष्कराच्या वाहनांना जाण्यासाठी रस्त्यावरील बर्फ हटवणारे 57 मजूर घटनास्थळाजवळ असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत अद्याप कुठलीही मनुष्यहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. लष्करासोबतच ITBP, NDRF, SDRF च्या बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
चमोलीच्या वरच्या भागात अनेक दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हवामान खात्याने याआधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. 3200 मीटरच्या वरच्या भागात बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. आता बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ हिमस्खलन झाले आहे. त्यात 57 मजूर अडकले. त्यापैकी 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
उत्तराखंडमधील माना गाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. या ठिकाणी लष्कराचा तळ आहे. त्यामुळे लष्कर प्रथम बचाव कार्यात गुंतले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे. बीआरओच्या पथकांनीही हिमस्खलनाबाबत बचावकार्य सुरू केले आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी आयआरएसशी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहे. त्यांना बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माना गाव आणि माना खिंडीदरम्यान बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला हिमस्खलन झाल्याची माहिती मिळाली होती.
जनपद चमोली में माणा गांव के निकट BRO द्वारा संचालित निर्माण कार्य के दौरान हिमस्खलन की वजह से कई मजदूरों के दबने का दुःखद समाचार प्राप्त हुआ।
ITBP, BRO और अन्य बचाव दलों द्वारा राहत एवं बचाव कार्य संचालित किया जा रहा है।
भगवान बदरी विशाल से सभी श्रमिक भाइयों के सुरक्षित होने की…
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) February 28, 2025
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. अडकलेल्यांपैकी 16 मजुरांची सुटका करण्यात आल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले. ते म्हणाले, ‘चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओने केलेल्या बांधकामादरम्यान हिमस्खलनामुळे अनेक मजूर गाडल्याची दुःखद बातमी मिळाली.