AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत थर्ड AC झालाय स्लीपर क्‍लास? कारण आले समोर, रेल्वेचा निर्णय असा की…

Indian Railways Third AC class: एसी क्‍लासचे उत्पन्न वाढल्यानंतर रेल्वे नॉन एसी क्‍लासचे कोच वाढवत आहे. पुढील तीन वर्षांत 17000 कोच निर्माण करण्यात येणार आहे. हे सर्व कोच 2028 मध्ये तयार होतील. दरवर्षी 6000 कोच निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.

रेल्वेत थर्ड AC झालाय स्लीपर क्‍लास? कारण आले समोर, रेल्वेचा निर्णय असा की...
railway ac coachImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 28, 2025 | 1:29 PM
Share

Indian Railways Third AC class: भारतीय रेल्वेतून कोट्यावधी प्रवासी रोज प्रवास करतात. अनेक जण सुखकार प्रवासासाठी आरक्षण करुनच प्रवास करतात. परंतु स्लीपर क्लासमध्ये जनरल तिकीटाचे प्रवासी बसतात. तर रेल्वेच्या थर्ड एसीची परिस्थिती स्लीपर क्लाससारखी झाली आहे. थर्ड एसीमधील प्रवाश्यांना काही सुविधा दिल्या जात नाही. चांगल्या सुविधा हव्या तर आता सेकेंड एसीचा पर्याय आहे. यासंदर्भात रेल्वेला मिळणारा महसूलसुद्धा समजून घेऊ या…

अशी आहे आकडेवारी

रेल्वे मंत्रालयातील आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत एसी क्लासचा महसूल वाढला आहे. परंतु स्लीपर क्लासमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. सन 2019-20 मध्ये रेल्वेला एसी क्‍लासमधून केवळ 36 टक्के उत्पन्न मिळत होते. त्यात एसी फर्स्‍ट, एसी सेकेंड, एसी थर्ड, एसी चेअरकार सर्वांचा समावेश आहे. सर्वाधिक उत्पन्न एसी थर्ड क्‍लासचे होते. सन 2024-25 मध्ये एसीचे उत्पन्न 54 टक्के झाले. एसी क्‍लासचे उत्पन्न दीड पट वाढले. आकडेवारीनुसार रेल्वेला मिळणाऱ्या 80000 कोटींच्या उत्पन्नापैकी एसी क्‍लासचे उत्पन्न 50669 कोटी आहे. म्हणजेच एसी क्‍लासचे उत्पन्न वाढत आहे.

नॉन एसीचे उत्पन्न असे

नॉन एसी क्लासमधून सन 2019-20 मध्ये प्रवाशांकडून मिळालेला एकूण महसूल 58 टक्के होता. यामध्ये सेकंड क्लास, स्लीपर, नॉन-एसी चेअरकार, उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कमाईचा समावेश होता. परंतु 2024-25 मध्ये त्यात घसरण झाली आहे. हे उत्पन्न केवळ 41 टक्क्यांवर आले आहे.

2019-20 मध्ये एसी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या 18 कोटी होती. वर्षभरात 809 कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. हा आकडा केवळ 2.2 टक्के होता. तर 2024-25 मध्ये ही संख्या वाढून सुमारे 38 कोटी झाली आहे.

17000 नॉन एसी कोचची निर्मिती

एसी क्‍लासचे उत्पन्न वाढल्यानंतर रेल्वे नॉन एसी क्‍लासचे कोच वाढवत आहे. पुढील तीन वर्षांत 17000 कोच निर्माण करण्यात येणार आहे. हे सर्व कोच 2028 मध्ये तयार होतील. दरवर्षी 6000 कोच निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे 6 लाख जास्त प्रवाशी यामधून प्रवास करु शकतील.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.