गोव्यात उद्रेक, ऑक्सिजन अभावी आधी 26, आता 15 रुग्णांचा मृत्यू!

| Updated on: May 14, 2021 | 4:46 PM

गोव्यातील रुग्णालयात 15 कोरोना (Goa Oxygen shortage) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन प्रेशर (Oxygen shortage) कमी झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

गोव्यात उद्रेक, ऑक्सिजन अभावी आधी 26, आता 15 रुग्णांचा मृत्यू!
Goa 15 patient died
Follow us on

पणजी : गोव्यातील रुग्णालयात 15 कोरोना (Goa Oxygen shortage) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन प्रेशर (Oxygen shortage) कमी झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसापूर्वीच ऑक्सिजनअभावी 26 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी 15 रुग्णांनी ऑक्सिजनअभावी जीव गमावला आहे. गोवा सरकारी रुग्णालयाच्या (Goa Medical College and Hospital) अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, जोपर्यंत गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. (Goa corona cases update 15 COVID19 patients died allegedly due to oxygen shortage at Goa Medical College & Hospital )

वृत्तसंस्था एएनआईच्या मते, “ऑक्सिजन पुरवठ्याअभावी रात्री दोन ते पहाटे सहापर्यंत रुग्णांचा मृत्यू झाला”.

एका रुग्णाच्या मित्राने केलेला दावा अतिशय गंभीर आहे. त्याच्या दाव्यानुसार, या रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दररोज 20-25 जणांचा मृत्यू होतो. या दाव्यात कितपत तथ्य आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे.

दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, सध्या जे मृत्यू झाले त्याचं नेमकं कारण काय याचा शोध सुरु आहे.

यापूर्वी गोव्यातील याच रुग्णालयात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा 15 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे.

दोन दिवसापूर्वी 26 जणांचा मृत्यू 

गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. 11 मे रोजी पहाटे 2 ते सकाळी 6 या 4 तासात 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने गोव्यात एकच खळबळ माजली. या संपूर्ण घटनेची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली होती. तसंच या प्रकरणाचं सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणीही राणे यांनी केलीय.

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती

दरम्यान, यापूर्वी 11 मे रोजीच साऊथ गोवामधील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागली होती. त्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. ऑक्सिजन टँक गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत ऑक्सिजनची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान रुग्णालय परिसरात पांढऱ्या धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या  

Goa Night Curfew : गोव्यातही रात्रीची संचारबंदी!, काय सुरु काय बंद राहणार?