
अहमदाबाद: गोव्यातील तरुण टेक खेळाडूंनी जागतिक STEM आणि रोबोटिक्स ऑलिंपियाड (WSRO) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेऊन राज्याचे नाव उंचावले. ही प्रतिष्ठित स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांनी विविध STEM आणि रोबोटिक्स चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. गोव्याच्या संघांनी रोबोटिक्स डिझाइन, प्रोग्रामिंग, ऊर्जा नवोन्मेष आणि वैज्ञानिक संशोधन यासारख्या क्षेत्रात चमकदार कामगिरी केली.
WSRO राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 ही स्पर्धा हॅपीनेस रिझर्व्ह फाउंडेशन, चिरिपाल ग्रुप, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि गुजरात सायन्स सिटी, अहमदाबाद यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. या स्पर्धेचे नेतृत्व WSRO चे संस्थापक विशाल चिरिपाल यांनी केले. या स्पर्धेमुळे देशभरातील तरुण खेळांडूंना ना नवोन्मेषासाठी प्रेरित केले आहे.
वेदांग अनय कामत – सारस्वत विद्यालय, मापुसा
श्लोक आर. जुनवटकर – महिला आणि नूतन इंग्लिश हायस्कूल
भार्गव एम. शिरवंत – महिला आणि नूतन इंग्लिश हायस्कूल
निर्भय मनोज तालकर – प्रज्ञा हायस्कूल
रोनव चोडणकर आणि एरियाना चोडणकर – शारदा मंदिर स्कूल
इयान कॅलिस्टो नुनेस – सेंट बार्थोलोम्यू हायस्कूल
सुरभी – सारस्वत विद्यालय, मापुसा
क्युरियस माइंड्स इन्फोटेनमेंट प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक योगेश केरकर यांनी सर्व विजेते आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, ‘हे तरुण नवोन्मेषक याचा पुरावा आहे, की गोवा वेगाने रोबोटिक्स आणि एसटीईएम शिक्षणाचे केंद्र बनत आहे. त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता आणि टीमवर्क हे नाविन्याची भावना प्रतिबिंबित करते.’
गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. सावंत यांनी म्हटले की,’मला आमच्या गोव्यातील विद्यार्थ्यांचा खूप अभिमान आहे ज्यांनी WSRO सारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर त्यांची प्रतिभ दाखवली. हे तरुण भारताच्या तांत्रिक प्रवासाचे भविष्य आहेत आणि आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या भावनेला मूर्त रूप देत आहेत. या तरुणांना गोवा सरकारचा सदैव पाठिंबा असेल.’
क्युरियस माइंड्स इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने WSRO आयोजकांसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या अंतर्गत WSRO राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 गोव्यात आयोजित केले जाणार आहे. ही गोव्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. यामुळे गोवा रोबोटिक्स, एआय आणि एसटीईएमसाठी राष्ट्रीय केंद्र म्हणून बनेल.
WSRO राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025 ने तरुण विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. यातील अनेक खेळाडू दुबई येथे होणाऱ्या डब्ल्यूएसआरओ आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यामुळे गोव्याचा रोबोटिक्स प्रवास भविष्यात इंजीनियर्स, शास्त्रज्ञ आणि बदल घडवणाऱ्यांना प्रेरणा देत आहे.
संपर्क
क्युरियस माइंड इन्फोटेनमेंट प्रा. लि.
ईमेल: info@quriousmind.co.in
वेबसाइट: www.quriousmind.co.in