हॉटेलमध्ये कपल म्हणून जाणार आहात? मग रुममध्ये प्रवेश करताच सर्वात आधी ही जागा चेक करा, हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितलं काळं सत्य

अनेक जण पर्यटनासाठी बाहेर गावी गेल्यानंतर हॉटेलमध्ये मुक्काम करतात. मात्र आजच्या युगामध्ये तंत्रज्ञान हे प्रचंड प्रगत झालं आहे. त्यामुळे धोके देखील वाढले आहेत. अगदी तुम्ही ज्या रूममध्ये मुक्काम करणार आहात, तिथे स्पाय कॅमेरा असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

हॉटेलमध्ये कपल म्हणून जाणार आहात? मग रुममध्ये प्रवेश करताच सर्वात आधी ही जागा चेक करा, हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितलं काळं सत्य
हॉटेलमध्ये मुक्काम करण्यापूर्वी या गोष्टीची काळजी घ्या
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 31, 2026 | 11:17 PM

आपल्यातील अनेकांना पर्यटनाची आवड असते, आपण आपल्या फॅमिलीसोबत तसेच मित्र मैत्रिंसोबत कुठेतरी दूरवरच्या ट्रीपचं नियोजन करत असतो. आपण जेव्हा कुठे तरी अनोळखी ठिकाणी फिरण्यासाठी जातो, तेव्हा तिथे आपल्या राहण्याची व्यवस्था म्हणजे तिथे असलेले हॉटेल्स किंवा होम स्टे.  आपण राहण्यासाठी जे हॉटेल्स किंवा होम स्टे बुक केलं आहे, ते आपल्यासाठी नवीन असतं, म्हणजे यापूर्वी आपण कधीही तिथे राहिलेलो नसतो. त्यामुळे अशा हॉटेल्सबद्दल आपल्याला पूर्ण कल्पना नसते. अनेक जण तर ट्रीपला निघण्यापूर्वीच राहण्याची व्यवस्था म्हणून हॉटेल्स ऑनलाइन पद्धतीने बूक करतात. मात्र आपण जेव्हा एखादी हॉटेल्स ऑनलाईन पद्धतीने बुक करतो, तेव्हा तर आपण फक्त त्या हॉटेलच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरच अवलंबून असतो.

सध्या तंत्रज्ञान हे खूप प्रगत झालं आहे. त्यामुळे धोके देखील वाढले आहेत. विशेष: तुम्ही जेव्हा कपल्स म्हणून किंवा कुटुंबासोबत एका हॉटेलमध्ये स्टे करता तेव्हा काळजी घेणं गरजेचं असतं. अनेकदा हॉटेल्सच्या रूममध्ये स्पाय कॅमेरे बसवण्यात आल्याचे आणि नंतर ते उघडकीस आल्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आपण कुठेही फिरण्यासाठी गेलो तर मुक्कामासाठी हॉटेल्स निवडताना काळजी घेणं गरजेच असतं. विशेष: हॉटेल्स निवडताना हॉटेल थोडी महाग असेल तरी चालेल, मात्र  सुरक्षेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तसेच आपल्या ओळखीतील व्यक्ती कोणी जर आधी त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेली असेल तर त्यांचा अनुभव देखील महत्त्वाचा असतो.

हॉटेलमध्ये मुक्काम करताना नेहमी एका गोष्टीची काळजी घ्यावी, याबाबत स्वत: एका माजी हॉटेल कर्मचाऱ्याकडूनच माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही कपल्स म्हणून हॉटेलमध्ये जाणार असाल तर सर्वात आधी हॉटेलच्या रूममध्ये जिथे कुठे काच असेल, आरसा असेल अशा जागा आधी चेक कराव्यात कारण अशाच ठिकाणी स्पा कॅमेरा लपवला जाण्याची  शक्यता असते, असं या माजी  हॉटेल्स कर्मचाऱ्यानं म्हटलं आहे. तसेच तुमच्या रूमचे चारही कोपरे व्यवस्थित चेक करा, असा सल्लाही या हॉटेल कर्मचाऱ्याने दिला आहे.

Follow Us