Gorakhnath Temple Attack : गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील अब्बासी मुर्तझाचं नवी मुंबई कनेक्शन, यूपी पोलिसांचं पथक चौकशीसाठी महाराष्ट्रात

| Updated on: Apr 05, 2022 | 10:41 AM

उत्तर प्रदेश पोलिसांना आणि एटीएसला मिळालेल्या पुराव्यांमधून मुर्तझाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. अब्बासीमुर्तझा हा आयआयटी बॉम्बेमधून शिकलेला आहे. तर, नवी मुंबईतील उच्चभ्रू ठिकाणी तो वास्तव्यास असल्याची माहिती आहे.

Gorakhnath Temple Attack : गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील अब्बासी मुर्तझाचं नवी मुंबई कनेक्शन, यूपी पोलिसांचं पथक चौकशीसाठी महाराष्ट्रात
गोरखनाथ मंदिर हल्लेखोर अब्बासी मुर्तजा
Image Credit source: tv9
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील (Gorakhpur) गोरखनाथ मंदिर (Gorakhnath Temple) परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन पोलीस जवान जखमी झाले आहेत. मुर्तझा अब्बासी (Murtaza Abbasi) असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन चौकशी सुरु केलीय. उत्तर प्रदेश पोलिसांना आणि एटीएसला मिळालेल्या पुराव्यांमधून मुर्तझाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे.  मुर्तझा हा आयआयटी बॉम्बेमधून शिकलेला आहे. तर, नवी मुंबईतील उच्चभ्रू ठिकाणी तो वास्तव्यास असल्याची माहिती आहे. आता उत्तर प्रदेश पोलीस आणि एटीएसचे पथक महाराष्ट्रात चौकशीसाठी येणार असल्याची माहिती आहे. अहमद मुर्तझा अब्बासी हा त्याच्या कुटुंबीयांसह 8 वर्ष मुंबईतील सानपाडा येथे वास्तव्यास होता. नवी मुंबईतील त्या सोसायटीमध्ये सध्या त्याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

मुर्तझा अब्बासीचं काय आहे नवी मुंबई कनेक्शन

मुर्तझा अब्बासीच्या आधारकार्डवर नवी मुंबईतील पत्ता आढळून आला आहे. मुर्तझा अब्बासी हा आयआयटी बॉम्बेमध्ये शिकलेला आहे. त्यानं केमिकल इंजिनअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. नवी मुंबईतील पोलिसांच्या माहितीनुसार मुर्तझाकडे सापडलेल्या कागदपत्रांवर उल्लेख असलेला फ्लॅट गेल्या पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर 9 मधील मिलेनियम टॉवरमधील सह्याद्रीस सोसायटीतील इमारत क्रमांक 9 मध्ये अब्बासी मुर्तझाच्या वडिलांना घर मिळालं होतं. 2013 मध्ये ते घर विकण्यात आल्याची माहिती आहे.

हल्ला करण्यापूर्वी मुर्तझा मुंबईत

मुर्तझा अब्बास यानं हल्ला गोरखनाथ मंदिर परिरसरात करण्यापूर्वी तो काही काळ मुंबईत होता असं समोर आलं आहे. मुर्तझा गोरखपूरला मुंबईहून आला होता. मुर्तझाकडे इंडिगो एअरलाईन्सचं तिकीटदेखील मिळाले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी घेतली जखमी पोलिसांची भेट

दोन मोठ्या कंपन्यांमध्ये काम

गोरखपूर मधील अब्बासी मुर्तझा यानं आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर दोन मोठ्या कंपनीत काम केलं आहे. देशातील दोन मोठ्या पेट्रोकेमिकल कंपन्यांमध्ये तो काम करत होता. अब्बासी मुर्तझा याला कोरोना काळात नोकरी गमवावी लागली होती. तर, अब्बासी मुर्तझायाला त्याची बायको सोडून गेली होती.

मानसिक उपचार सुरु

मुर्तझा अब्बासी याची मानसिक स्थिती ठीक नसल्यान त्याच्यावर उपचार सुरु होते. अहमदाबाद आणि इतर शहरांमध्ये उपचार करण्यात येत होते.

इतर बातम्या :

Sachin Kharat vs Raj Thackeray : ‘कोण चांगलं कोण वाईट याचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार राज ठाकरेंना कुणी दिला?’

Amravati Farmer : अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, ‘असा’ घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ