AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Farmer : अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, ‘असा’ घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. शेती उत्पादन वाढवण्यापासून ते अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत होईल अशा एक ना अनेक योजना राबवल्या जात आहे. यापैकीच स्व. गोपीनाथ मुंडे अपघात योजना ही एक आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला 2 लाखाची मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबियांना सावरण्यासाठी या रकमेचा उपयोग होत आहे.

Amravati Farmer : अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, 'असा' घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 10:14 AM
Share

अमरावती :  (Central Government) केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. शेती उत्पादन वाढवण्यापासून ते अडचणीच्या काळात (Farmer) शेतकऱ्यांना मदत होईल अशा एक ना अनेक योजना राबवल्या जात आहे. यापैकीच (Accident Insurance Scheme) स्व. गोपीनाथ मुंडे अपघात योजना ही एक आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला 2 लाखाची मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबियांना सावरण्यासाठी या रकमेचा उपयोग होत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 16 शेतकरी कुटुंबियांना 32 लाखाची मदत देण्यात आली आहे. गेल्या 7 वर्षापासून ही योजना राबवली जात आहे. कृषी विभागाकडे अर्ज केल्यानंतर योजनेचा लाभ घेता येणार आहे.

असा मिळवा योजनाचा लाभ

राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळणार आहे. याकरिता ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे. अपघात झाल्यानंतर पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात. कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यास किंवा शेतकरी कुटुंबास विमा रक्कम ही अदा केली जाते.

कोरोनामुळे योजनेली खीळ

कोरोनाचा परिणामही शासकीय योजनांवर झालेला होता. त्यामुळे अपघातामध्ये मृत्यूमुखी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत मिळण्यास उशिर झाला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ 16 शेतकऱ्यांच्या वारसांनाच ही रक्कम मिळाली आहे. अजूनही 105 शेतकऱ्यांचे अर्ज हे प्रलंबित आहेत. आता कुठे योजनेच्या माध्यमातून निधी वर्ग करण्यास सुरवात झाली आहे. शिवाय उर्वरित शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांनाही लवकरच रक्कम अदा केली जाणार आहे.

असे आहे मदतीचे स्वरुप

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Hapus Mango : ‘शिवनेरी’ हापूसलाही भौगोलिक मानांकन..! जुन्नरच्या वैभवात पडणार भर

Summer Crop : बहरात आलेलं सोयाबीन पदरात पडणार, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् संधीच सोनं करा

Cotton Rate : फेब्रुवारी वगळता कापूस तेजीतच, आता फरदड कापसाचाही तोरा कायम..!

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.