Summer Crop : बहरात आलेलं सोयाबीन पदरात पडणार, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् संधीच सोनं करा

दरवर्षी खरिपात बियाणांचा तुटवडा, विक्रेत्यांकडून फसवणूक यामुळे उत्पादनात घट हे ठरलेलं आहे. यंदा खरिपातील पिकाला लाजवेल असे सोयाबीन शेत शिवारात बहरत आहे. निसर्गाच्या कृपादृष्टीने खरिपात नुकसान झाले तरी उन्हाळ्यातील सोयाबीन पीक जोमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर खरिपातील बियाणांचा तर प्रश्न मिटणार आहेच पण यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे.

Summer Crop : बहरात आलेलं सोयाबीन पदरात पडणार, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् संधीच सोनं करा
जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन बहरले पण शेंगा न लागल्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 5:20 AM

लातूर : दरवर्षी (Kharif Season) खरिपात बियाणांचा तुटवडा, विक्रेत्यांकडून फसवणूक यामुळे उत्पादनात घट हे ठरलेलं आहे. यंदा खरिपातील पिकाला लाजवेल असे सोयाबीन शेत शिवारात बहरत आहे. निसर्गाच्या कृपादृष्टीने खरिपात नुकसान झाले तरी (Summer Crop) उन्हाळ्यातील सोयाबीन पीक जोमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर खरिपातील बियाणांचा तर प्रश्न मिटणार आहेच पण यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन केले तर फायद्याचे ठरणार आहे. कृषी विभागाच्या पुढाकारातूनच उन्हाळी सोयाबीनची संकल्पना ही समोर आली आहे. यंदा विक्रमी क्षेत्रात उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेतले गेले आहे. शिवाय आता याच सोयाबीनचा (Seed Production) बिजोत्पादनासाठी उपयोग करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या माध्यमातून दिला जात आहे.

असे मिळावावे प्रमाणीत बियाणे

येत्या उन्हाळी हंगामात सोयाबीनच्या एमएयूएस 71, एमएयूएस 162, एमएयूएस 612, फुले किमया, फुले संगम या वाणांचा 6 हजार 996 हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे. बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आधार कार्ड, बॅंक पासबूकची झेरॅाक्स ही जिल्हा महाबीज कार्यालयात जमा करावे लागणार आहे. त्यानंतरच आरक्षण करुन घेतले जाणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी सांगितले आहे.

यामुळे बिजोत्पादनच गरजेचे

उन्हाळी सोयाबीनचा उतारा हा कमीच असतो. कारण बिगर हंगामात हा प्रयोग केला गेला आहे. शिवाय कीड व रोग आणि उन्हाची तीव्रता यामुळे उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील सोयाबीनमधून उत्पादनाची आशा न बाळगता शेतकऱ्यांनी थेट बीजोत्पादन करुन बियाणे करावे असा सल्ला कृषी विभागाच्या माध्यमातून दिला जात आहे. शिवाय उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा मुळात हाच उद्देश आहे. बीजोत्पादन करुन शिल्लक सोयाबीन विक्री केले तर फायदा शेतकऱ्यांचाच आहे. पण आहे ते सोयाबीन विकून पुन्हा बियाणांसाठी भटकंती करण्यापेक्षा बीजोत्पादनावर भर देणे गरजेचे आहे.

योग्य नियोजनामुळे बहरतंय सोयाबीन

सोयाबीन हे खरिपातील पीक असले तरी सध्या उन्हाळ्यामध्ये या पिकाने शिवार हिरवागार केला आहे. शिवाय अधिकचे पाणी लागत असताना देखील योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी तीन ते चार फवारण्या केल्या आहेत शिवाय पाणी हे पाठाद्वारे न देता स्प्रिंक्लरचा वापर केला आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीन बहरत असून सध्या फुल आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत हे पीक आहे. केवळ कृषी विभागाच्या आवाहनानंतर पेराच नाही तर त्यानंतरही योग्य जोपासना केल्याने हे पीक बहरत आहे. उत्पादन आणि खरिपातील बियाणे असा दुहेरी हेतू साधण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

संबंधित बातम्या :

Cotton Rate : फेब्रुवारी वगळता कापूस तेजीतच, आता फरदड कापसाचाही तोरा कायम..!

Latur Market : सोयाबीनची विक्रमी आवक, 5 दिवसाच्या बंद नंतर काय आहे बाजारपेठेतले चित्र?

Rabi Season: पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड, एका ठिकाणी बसून 2 एकरातील क्षेत्र निगराणीखाली

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.