AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season: पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड, एका ठिकाणी बसून 2 एकरातील क्षेत्र निगराणीखाली

पीक संरक्षणासाठी आतापर्यंत तुम्ही गोफण, बुजगावणं याचे प्रयोग केलेले एकले असतील. यामध्ये कष्ट तर आहेच पण हे प्रभावी नसल्यामुळे पक्षांपासून याचे संरक्षण होईलच असे नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ढोणी गावच्या शेतकऱ्यानं पीक संरक्षणासाठी असं काय जुगाड लावलं आहे की ज्वारी, हायब्रीड याचा एक दाणाही पक्षांच्या तोंडी जाणार नाही. यामुळे पिकांचे संरक्षण तर होत आहे पण सध्याच्या कडक ऊनापासून त्या शेतकऱ्याचा बचावही होत आहे.

Rabi Season: पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड, एका ठिकाणी बसून 2 एकरातील क्षेत्र निगराणीखाली
पक्षांपासून पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लावली आङे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 04, 2022 | 12:53 PM
Share

वाशिम :  (Protection Cr0p) पीक संरक्षणासाठी आतापर्यंत तुम्ही गोफण, बुजगावणं याचे प्रयोग केलेले एकले असतील. यामध्ये कष्ट तर आहेच पण हे प्रभावी नसल्यामुळे पक्षांपासून याचे संरक्षण होईलच असे नाही. त्यामुळे (Washim) जिल्ह्यातील ढोणी गावच्या शेतकऱ्यानं पीक संरक्षणासाठी असं काय जुगाड लावलं आहे की ज्वारी, हायब्रीड याचा एक दाणाही पक्षांच्या तोंडी जाणार नाही. यामुळे पिकांचे संरक्षण तर होत आहे पण सध्याच्या (Summer) कडक ऊनापासून त्या शेतकऱ्याचा बचावही होत आहे. एका ठिकाणी सावलीत बसून चक्क दोन एकरातील पिकांचे संरक्षण ते सहज करु शकत आहेत. ढोणी गावचे गजानन शेळके यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. त्यामुळे पिकाची नासाडी तर टळलेली आहेच पण उत्पादनातही भर पडेल असा त्यांचा दावा आहे.

नेमकं काय केलं आहे गजानन शेळके शेतकऱ्याने?

ढोणी गावचे गजानन शेळके यांची हायब्रीड आणि ज्वारी हंगामाच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी चक्क घरातील पाण्याच्या हंड्याचा वापर केला आहे. दोन एकरातील क्षेत्रामध्ये बांबूच्या सहायाने हांडे बांधले आहेत. या हंड्यामध्ये बारिक दगड,गोटे टाकून ते कापडाच्या सहाय्याने बंद केले आहे. एका एकरात किमान 4 ते 5 ठिकाणी असे करुन सर्व हांड्याचे दोर स्वत:कडे ठेऊन ते सातत्याने हालवत आहेत. त्यामुळे हांड्यातील दगड, गोटे यांचा गोंगाट होऊन पक्षीच काय जनावरे देखील पिकाकडे फरकत नाही. शिवाय एकाच जागेवरुन ते पिकाचे संरक्षण करु शकत आहेत. याकरिता काही खर्च नाही शिवाय एका ठिकाणी सावलीत बसून ते पिकांचे संरक्षण करु शकतात.

पीक बहरात, उत्पादन वाढीची आशा

रब्बी हंगामातील पीके यंदा बहरात आहेत. मध्यंतरीच्या अवकाळीचा अपवाद वगळता पिकांची वाढ जोमात झाली असून आता ज्वारी, हायब्रीड, हरभरा ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण तो पाण्याचा साठा होता म्हणून यशस्वी झाला आहे. खरीप हंगामात न भरुन निघणारे नुकसान झाले होते पण रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडतील अशी आशा आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात नुकसान होऊ नये म्हणून अशा पध्दतीने पिकांचे संरक्षण केले जात आहे.

सकाळ-संध्याकाळ पक्षांकडून पिकांचे नुकसान

रब्बी हंगामातील ज्वारी, हायब्रीड, गहू ही पिके अंतिम असताना पक्षांकडून याला धोका असतो. शेत शिवारात सकाळ अन् संध्याकाळीच पक्षांचा चिवचिवाट असतो. याच दरम्यान पक्षांचे थवे येऊन थेट ज्वारीच्या कणसावर येऊन बसतात. त्यामुळे पिकांची नासाडी तर होतेच शिवाय उत्पादन घटीचाही धोका आहे. शेतकऱ्याच्या या अनोखा उपक्रमामुळे इतर शेतकरीही प्रभावित झाले आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : यंदाही सोयाबीनचे प्रमाणित बियाणेच नाही, कृषी विभागाचा काय आहे सल्ला?

Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले

Solapur Rain: सोसाट्याच्या वाऱ्यासह सोलापुरात मुसळधार! अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी धास्तावले

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या