Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले

खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी चार महिने मेहनत घेऊनही जे साध्य झालं नाही ते यंदा हंगामी पिकांमधून होत आहे. उन्हाच्या वाढत्या झळा ह्या कलिंगड आणि लिंबू उत्पादकांसाठी सुखद गारवा देत आहेत. भर उन्हाळ्यामध्ये कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय दरही सरासरीपेक्षा अधिक आहे. सर्वकाही पोषक असताना नायगांव तालुक्यातील कोकलेगावातील मारोती पाटलांनी 2 एकरात 60 टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाटलाच्या या दर्जेदार कलिंगडला थेट हैदराबादहून मागणी होत आहे.

Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले
बदलत्या वातावरणामुले कलिंगड उत्पादनावर परिणाम होतोय.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:21 AM

नांदेड : खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी चार महिने मेहनत घेऊनही जे साध्य झालं नाही ते यंदा (Seasonable Crop) हंगामी पिकांमधून होत आहे. (Summer) उन्हाच्या वाढत्या झळा ह्या कलिंगड आणि लिंबू उत्पादकांसाठी सुखद गारवा देत आहेत. भर उन्हाळ्यामध्ये  (Watermelon) कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय दरही सरासरीपेक्षा अधिक आहे. सर्वकाही पोषक असताना नायगांव तालुक्यातील कोकलेगावातील मारोती पाटलांनी 2 एकरात 60 टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाटलाच्या या दर्जेदार कलिंगडला थेट हैदराबादहून मागणी होत आहे. व्यापारी बांधावर येऊन कलिंगडची खरेदी करीत असल्याने वाहतूकीचा खर्च तर टळला आहेच पण विक्रमी उत्पादनाबरोबर यंदा विक्रमी दरही मिळत आहे.

परराज्यात विक्रीने मोठा फायदा

स्थानिक बाजारपेठेपेक्षा परराज्यातून कलिंगडला अधिकची मागणी होत आहे. शिवाय दरही चांगला मिळत आहे. कलिंगड हे 12 ते 14 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा यंदा अधिकचा दर मिळत आहे. शिवाय 70 दिवसांमध्ये हे पीक पदरात पडत आहे. यंदा कलिंगडाच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याने या वाढीव दराचा मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मारोती पाटील यांनी 2 एकरामध्ये लागवड केली होती. कीड-रोगराईपासून संरक्षण व्हावे याकरिता प्लॅस्टिकचे कपड्याचे अच्छादन आणि पाण्याचे योग्य नियोजन यामुळे त्यांचा फड साधलेला आहे. व्यापाऱ्यांकडून तर मागणी वाढत आहेच शिवाय स्थानिक बाजारपेठेतही दर वधारले आहेत.

पोषक वातावरणाला पाणी साठ्याची जोड

आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यात अवकाळीने हजेरी न लावल्यामुळे कलिंगड या हंगामी पिकाची वाढ झाली. शिवाय मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने कोणते संकट ओढावले नाही. तीन ते चार फवारण्या करुन पाटील यांनी हे पीक जोपासले आहे. आता 70 दिवसाची मेहनत ही कामी आली असून जे हंगामातील पिकांमधून साधले नाही ते कलिंगडातून शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे.

सरकारच्या त्या निर्णयाचाही फायदा

दोन वर्षात कोरोनामुळे जे निर्बंध लादण्यात आले होते त्यामुळे कलिंगडला मार्केटच मिळाले नव्हते. परिणामी शेतकऱ्यांनी कलिंगड हे फुकटात वाटली होती. पण यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. शिवाय बाजारपेठा पूर्ण क्षमतेने खुल्या करण्यात आल्या असून वाढत्या उन्हामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. 12 ते 14 रुपये किलोप्रमाणे कलिंगडची विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे गत दोन वर्षात झालेले नुकसान यंदा भरुन निघेल असा शेतकऱ्यांना विश्वास आहे.

संबंधित बातम्या :

‘जीआय’ च्या नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री केल्यास जेलची हवा, पणन संचालकाचे काय आहेत निर्देश?

Solapur Rain: सोसाट्याच्या वाऱ्यासह सोलापुरात मुसळधार! अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी धास्तावले

Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसासाठी आता अतिरिक्त अधिकारी, काय आहे साखर आयुक्तांचे धोरण ?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.