AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जीआय’ च्या नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री केल्यास जेलची हवा, पणन संचालकाचे काय आहेत निर्देश?

भौगोलिक मानांकनाच्या नावाखाली इतर शेतीमालाचीही विक्री होत आहे. विशेषत: फळपिकांमध्ये हा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या आंबा फळपिकाबाबत असे घडताना पाहवयास मिळत आहे. मुंबई बाजारपेठेत हापूसच्या नावाखाली अन्य आंब्याचीच विक्री होत आहे. आतापर्यंत यावर अंकूश यावा म्हणून एक ना अनेक पर्याय अवलंबले आहेत पण हा प्रकार सुरुच आहे. त्यामुळे पणन संचालकांनी याबाबत कडक धोरण अवलंबले असून आता 'जीआय' च्या नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

'जीआय' च्या नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री केल्यास जेलची हवा, पणन संचालकाचे काय आहेत निर्देश?
हापूस आंब्याची आवक घटली आहे.
| Updated on: Apr 04, 2022 | 10:44 AM
Share

पुणे :  (Geographical rating) भौगोलिक मानांकनाच्या नावाखाली इतर शेतीमालाचीही विक्री होत आहे. विशेषत: (fruit crop) फळपिकांमध्ये हा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या आंबा फळपिकाबाबत असे घडताना पाहवयास मिळत आहे. मुंबई बाजारपेठेत हापूसच्या नावाखाली अन्य आंब्याचीच विक्री होत आहे. आतापर्यंत यावर अंकूश यावा म्हणून एक ना अनेक पर्याय अवलंबले आहेत पण हा प्रकार सुरुच आहे. त्यामुळे पणन संचालकांनी याबाबत कडक धोरण अवलंबले असून आता ‘जीआय’ च्या नावाखाली बनावट (Agricultural goods) शेतीमालाची विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार तर आहेच दर्जेदार मालही ग्राहकांना मिळणार आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित बाजार समित्यांनी ही कारवाई करण्याच्या सूचना पणन संचालकांनी दिल्या आहेत.

बाजार समित्यांची काय असणार जबाबदारी

शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवर बाजार समित्यांचा अंकूश असतो. त्यानुसार इतर राज्यातून आवक झालेला शेतीमाल त्याच राज्याच्या नावाने विकला जातो की नाही याची खात्री बाजार समिती प्रशासनाला करावी लागणार आहे. त्यानुसार जर विक्री होत नसेल तर मात्र, कारवाईचे अधिकार हे बाजार समित्यांना राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार समोर येत असल्याने पणन संचालकांना असा निर्णय घ्यावा लागला आहे. बाजार समित्यांबरोबर शेती उत्पादक कंपन्या, शेती बचतगट यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत.

आंबा फळपिकामध्ये अधिकची फसवणूक

सध्या आंब्याचा हंगाम सुरु आहे. याच दरम्यान ही कारवाईची भूमिका प्रशासनाला घ्यावी लागली आहे. कारण आंब्याच्या बाबतीमध्येच असे प्रकार घडताना दिसत आहे. ग्राहकांकडून हापूस आंब्याची मागणी होत असताना इतर राज्यातून येणार आंबाही हापूस असल्याचे भासवत विक्री केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कारवाईच्या धास्तीने असे प्रकार कमी होतील असा अंदाज आहे.

‘जीआय’ प्राप्त उत्पादकांना काय करावे लागणार

जीआय उत्पदनाची महिती ही ग्राहकांपर्यंत पोहचवावी लागणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जीआय अंतर्गत बागांची नोंद करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना बागा आणि उत्पादनाचा क्यूआर कोड तयार करावा लागणार आहे. एवढेच नाही तर वेबसाईटवर नोंदणीधारक बागा आणि शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करावी लागणार आहे. यामुळे जीआय उत्पादक मालच ग्राहकांपर्यंत पोहचेल असा विश्वास आहे.

संबंधित बातम्या :

Solapur Rain: सोसाट्याच्या वाऱ्यासह सोलापुरात मुसळधार! अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी धास्तावले

Kisan Credit Card : कार्डमुळे वाढणार शेतकऱ्यांचे Credit, कार्ड नेमके मिळवायचे कसे ? घ्या जाणून

Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसासाठी आता अतिरिक्त अधिकारी, काय आहे साखर आयुक्तांचे धोरण ?

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.