केंद्र सरकारचं मोठं काम, देशातील 576 भाषा आणि बोलीभाषांचं सर्व्हेक्षण पूर्ण…

| Updated on: Nov 08, 2022 | 2:46 PM

गृह मंत्रालयाने देशभरातील 576 भाषा आणि बोलीभाषांचे सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

केंद्र सरकारचं मोठं काम, देशातील 576 भाषा आणि बोलीभाषांचं सर्व्हेक्षण पूर्ण...
Follow us on

नवी दिल्लीः केंद्र सरकारकडून आता नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे कला, संस्कृती, शिक्षण आणि भाषेसंदर्भातही वेगवेगळी कामं केली जात आहेत. नुकतेच गृह मंत्रालयाने देशभरातील 576 भाषा आणि बोलीभाषांचे सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असल्याचे एका अहवालाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाच्या 2021-22 च्या वार्षिक अहवालानुसार, प्रत्येक आदिवासी बोलीभाषांचे खरे स्वरूप, आणि त्याचे जतन आणि विश्लेषण करण्यासाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रामध्ये (NIC) त्याचे एक ‘वेब’ संग्रह स्थापन करण्याची योजना आखण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाच्या अहवालानुार यासाठी देशी भाषेसंदर्भात माहिती जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

देशाच्या गृहमंत्रालयाकडून भारतीय मातृभाषा सर्वेक्षण (MTSI) प्रकल्पातून 576 मातृभाषांच्या ‘फील्ड व्हिडिओग्राफी’सह यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाकडून याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की, भारतीय भाषा सर्वेक्षण (LSI) ही एक नियमित संशोधन प्रक्रिया आहे.

या प्रकल्पांतर्गत पूर्वीच्या भाषेसंदर्भातील कार्य पुढे चालू ठेवण्यात आले आहे. तसेच भारतीय भाषा सर्व्हेक्षणाचे झारखंडमधीलही काम पूर्ण करण्यात आले आहे. आणि तर त्याच पद्धतीचे हिमाचल प्रदेशमधीलही काम पूर्णत्वाकडे गेले आहे.

या कामांबरोबरच भारतीय भाषा सर्व्हेक्षणामधील तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील सर्व्हेक्षणाचे कामही प्रगतीपथावर असल्याचे अहवालात म्हटले आहे.

देशातील भाषा आणि बोलीभाषांचा ‘स्पीच डेटा’ गोळा करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ ‘NIC सर्व्हर’वर शेअर केले जाणार असल्याचेही म्हटले आहे.

भाषा आणि बोलीभाषांचा संग्रह करत असतान गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, आगामी जनगणनेमध्ये प्रगत भूस्थानिक तंत्रज्ञानासह अनेक नव नवीन उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, कोविड-19 च्या महामारीमुळे जनगणना झाली नव्हती.प्रगत भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासह वेगवेगळे अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

जनगणनेपूर्व देशाच्या संपूर्ण भौगोलिक क्षेत्राचा योग्य कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, जिल्हे, उपजिल्हे, गावं, शहरं आणि शहरांमधील प्रशासकीय एकके दर्शविणारे नकाशे तयार करणे आणि अद्यायवत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

वेब आधारित नकाशांद्वारे जनगणनेचे निकाल प्रसारित करण्याचे प्रयत्नही केले जात असल्याचे सांगत त्या दिशेने पूर्वतयारीचे काम सुरू करण्यात आली आहेत.