वीरेंद्र सेहवाग-आरतीचा काडीमोड? काय आहे ग्रे घटस्फोट? कसा मिळतो पत्नीला संपत्तीत हिस्सा

Virender Sehwag-Aarti Grey Divorce : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर येत आहे. दोघांनीही अजून याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही.

वीरेंद्र सेहवाग-आरतीचा काडीमोड? काय आहे ग्रे घटस्फोट? कसा मिळतो पत्नीला संपत्तीत हिस्सा
वीरेंद्र सेहवाग-आरती घटस्फोट
| Updated on: Jan 30, 2025 | 11:01 AM

46 वर्षांचे वीरेंद्र सहवाग यांनी 2004 मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना आर्यवीर आणि वेदांत ही दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी सराव करत आहेत. तर दुसरीक़डे लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्यावर वयाच्या या टप्प्यात दोघांच्या नात्यात दुराव्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघेही विभक्त होण्याची चर्चा रंगली आहे. वीरेंद्र सेहवाग आणि आरती ग्रे-घटस्फोट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय आहे हा ग्रे डिव्होर्स?

Grey Divorce हा पूर्वी अनेकांनी घेतला आहे. सुपरस्टार कमल हसन आणि सारिका ठाकूर, बॉलिवूड अभिनेता अरबाज खान-मलायका आरोरा, आमिर खान, कबीर बेदी, आशिष विद्यार्थी आणि इतरांनी हा घटस्फोट घेतला आहे. जाणून घेऊयात काय आहे ग्रे घटस्फोट?

ग्रे-घटस्फोट म्हणजे काय?

ग्रे-डिवोर्सला सिल्व्हर स्प्लिटर्स अथवा डायमंड घटस्फोट असे पण म्हणतात. पती आणि पत्नीने वयाची पन्नाशी गाठली असेल, अनेक वर्षांपासून दोघांचा संसार सुरू असेल आणि ते वेगळे होण्याचा निर्णय घेत असतील तर त्याला ग्रे घटस्फोट म्हणतात. पती-पत्नीमध्ये 15 ते 25 वर्षांचे सहजीवन असेल आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असेल तर तो ग्रे घटस्फोट ठरतो. म्हणजे केस पांढरे झाल्यानंतर हा घटस्फोट होते, असा त्याचा सरळ अर्थ होतो.

आकड्यांचा दावा काय?

अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या एका अहवालानुसार, सध्या घटस्फोट घेणारे जवळपास 40% लोक हे 50 वा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. या अहवालानुसार, 1990 नंतर ग्रे घटस्फोटाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. तर वयाच्या 65 वर्षे उलटल्यानंतर घटस्फोट घेणार्‍यांची संख्या तिप्पट वाढली आहे. अमेरिकेत 34% ग्रे घटस्फोट असे आहेत, ज्यामध्ये पती-पत्नी 30 वर्षे एकत्र राहिल्यानंतर विभक्त झाले आहेत. असे घटस्फोट हे शारिरीक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्‍या सर्वात नुकसान करणारे असल्याचा दावा करण्यात येतो.

कोर्टात मोठ्या अडचणी

अर्थात आयुष्याच्या मध्यावर इतके वर्षांचा सहवास सोडून दोन व्यक्ती विभक्त होणे हे खरंतर क्लेशदायक असते. पोटगी, वाढत्या वयाचे ओझे या सर्वांची दक्षता घ्यावी लागते. त्यामुळे अशा प्रकरणात न्यायालयात गंभीर चिंतन होते. पतीसह पत्नीला ही त्रास होणार नाही, याची दक्षता अशा प्रकरणात घ्यावी लागते. हिंदू विवाह कायदा, 1954 अंतर्गत घटस्फोट होतो. यामध्ये वय, आर्थिक जबाबदारी याचा विचार करून पुढील निर्णय होतो.