Gujarat riots 2002 : मोदींनी 19 वर्ष भगवान शंकराप्रमाणे खोट्या आरोपांचे विष पचवले; शेवटी सत्याचा विजय झाला, गुजरात दंगल प्रकरणावर शाहांची प्रतिक्रिया

गुजरात दंगलीशी संबंधित जाकिया जाफरी केस प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुप्रीम कोर्टाने क्लिन चीट दिली आहे. यावर प्रथमच अमित शाह यांनी आज प्रतिक्रिया दिली. गेले 19 वर्ष मोदींनी टीकेचे विष पचवल्याचे ते यावेळी म्हणाले.

Gujarat riots 2002 : मोदींनी 19 वर्ष भगवान शंकराप्रमाणे खोट्या आरोपांचे विष पचवले; शेवटी सत्याचा विजय झाला, गुजरात दंगल प्रकरणावर शाहांची प्रतिक्रिया
| Updated on: Jun 25, 2022 | 11:49 AM

नवी दिल्ली : गुजरात दंगलीशी (Gujarat riots) संबंधित जाकिया जाफरी केस प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना सुप्रीम कोर्टाने क्लिन चीट दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले की, गेल्या 19 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगली प्रकरणात अनेक खोटेनाटे आरोप करण्यात आले. मात्र त्यांनी या आरोपांना कधीही प्रत्युत्तर दिले नाही, ते 19 वर्ष भगवान शंकराप्रमाणे हे सर्व टीकेचे विष पचवत राहिले. मात्र आज तब्बल 19 वर्षांनंतर या केसचा निकाल लागला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदींना क्लिन चीट दिली आहे. या क्लिन चीटमुळे पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते, ते पुसल्या गेले आहेत. ज्यांनी गुजरात दंगली प्रकरणात मोदींवर आरोप केले त्यांनी आता माफी मागवी, असे देखील अमित शाह यांनी म्हटले आहे.

 

अनेक खोटे आरोप झाले

पुढे बोलताना अमित शाह यांनी म्हटले आहे की गुजरात दंगली प्रकरणात पंतप्रधान मोदी यांची चौकशी झाली, मलाही अटक झाली. त्यानंतर देखील मोदींवर राजकीय आयडिओलॉजी घेऊन आलेल्या पत्रकारांनी, एनजीओंनी आणि विरोधकांनी आरोप सुरूच ठेवले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी एकही शद्ब बोलले नाहीत. त्यांनी हे टीकेचे विष पचवले. आज 19 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून मोदींना क्लिन चीट मिळाली आहे. ही दंगल पुर्वनियोजीत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे. या निर्णयामुळे खूप आनंद होतोय. मी हे दु:ख पचवताना मोदींना खूप जवळून पाहिले आहे. मला याचे वाईट वाटते की, सत्याची बाजू असताना देखील त्यांना खोट्या आरोपांचा सामना करावा लागला. मात्र ते या प्रकरणात एकही शद्ब बोलले नाहीत.

विरोधकांनी माफी मागावी

दरम्यान या प्रकरणात ज्यांनी खोटे आरोप केले त्यांनी आता माफी मागावी अशी मागणी देखील अमित शाह यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे, हा निर्णय अपेक्षीत होता. 19 वर्षांनंतर सत्याचा विजय झाला. या विजयाचे सोने आता चमकत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोप पुसले गेले आहेत. आम्ही कायमच लोकशाहीचा सन्मान करत आलो आहोत. प्रकरण न्यायालयात सुरू होते, त्यामुळे आम्ही यावर एकाही शद्बाने प्रतिक्रिया दिली नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे.